आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धक धक गर्ल\'च नव्हे तर या मराठमोळ्या अभिनेत्रींनीही गाजविले बॉलिवूडवर अधिराज्य, मोठी आहे यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी मुलगी म्हणून आपल्याला नेहमीच माधुरी दीक्षितचा आणि तिच्या बॉलिवूड कारकिर्दीचा अभिमान वाटतो. 'हमको आज कल है इंतजार..' या गाण्यातील माधुरीच्या मराठी लुकने सर्वाच्याच काळजाचा ठोका चुकविला होता. आता माधुरी बकेटलिस्ट या चित्रपटाद्वारे मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी घेऊन येत आहे. मराठी चित्रपटात माधुरी प्रथमच मुख्य भूमिका करत आहे आणि त्यात तिच्या नायकाची भूमिका अभिनेता सुमीत राघवनने केली आहे. 

 

बॉलिवूडमध्ये यशाचे सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर माधुरी आता मराठीत आल्याने सर्वच चाहते आनंदात आहेत आणि तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. पण केवळ माधुरी एकटीच नव्हे तर अशा अनेक बॉलिवूडमधील मराठी  अभिनेत्री आहेत ज्यांनी संपू्र्ण जगभरात त्यांची एक वेगळी ओळख आणि प्रेक्षकवर्ग निर्माण केला. आज अशाच काही अभिनेत्रींची माहिती खास आपल्यालाठी घेऊन आलो आहोत.

 

स्मिता पाटील 
स्मिता पाटील यांचे नाव हिंदी चित्रपटातील एका महान नायिकेच्या रुपात घेतले जाते.  अनेक हिट चित्रपट दिलेल्या स्मिता पाटील यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला. अगोदर न्यूज रिडर असलेल्या स्मिता पाटील यांनी नंतर अभिनयाची यशस्वी कारकिर्द बनविली. 

 

तनूजा 
अभिनेत्री तनुजा समर्थ म्हणजेच केवळ तनुजा यांचा जन्म मुंबई येथे मराठी कुटुंबात झाला. मोठ बहिण नूतन यांच्यासोबत 'हमारी बेटी' या चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.  

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा बॉलिवूडमधील काही मराठी Beauties...

बातम्या आणखी आहेत...