आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Serial Ghadage And Sun Latest Track Telly World : अमृताला मिळणार पेढीवर बसण्याचा मान!, घर आणि पेढी सांभाळण्याचे असेल आव्हानं

Telly World : अमृताला मिळणार पेढीवर बसण्याचा मान!, घर-पेढी सांभाळण्याचे असेल आव्हानं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


घाडगे & सून मालिकेमध्ये अमृताचा घाडगे सदन मधील प्रवास बराच चढ उतारांचा ठरला. मनाविरुद्ध अक्षयशी लग्न होणे, तिचे करिअर मागे ठेवणे, माईच्या आणि घाडगे परिवाराच्या आशा अपेक्षांवर खरे उतरणे, अक्षयवरच्या प्रेमाला बाजूला ठेऊन त्याला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे आणि बरेच काही. घाडगे & सून मालिकेने समाजाला एक प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला की, घरातल्या सुनांना मुलींसारखेच वागवा, त्यांना त्यांचे हक्क, अधिकार द्या. मुलगा चूक असेल तर त्याची शिक्षा सुनांना देऊ नका. एक मुलगी निस्वार्थी मनाने सासरी येते आपल्या माहेरच्या माणसांना मागे सोडून. ती या विश्वासाने सासरी येते की, तिचा नवरा आणि सासरची मंडळी तिला स्वीकारतील, तिला आपलसं करतील. पण अस होताना खुपचं कमी दिसते. उलट मुलांच्या चुकांचे खापर सुनांनवरच फोडले जाते. परंतु माईना जेंव्हा कळाले अक्षयचे प्रेम कियारावर आहे आणि तो तिच्यासोबत राहू इच्छितो तेव्हा त्यांनी अक्षयला घरातून बाहेर काढले. अनेक अडथळ्याना खंबीरपणे सामोरे गेलेल्या अमृताला आता मात्र अण्णांचा आधार मिळाला आहे. 

 

आता मालिकेला नवे वळण आले असून अमृताला घाडग्यांच्या पेढीवर बसण्याचा मान मिळाला आहे. घरातल्यांची आणि माई तसेच अण्णा यांची इच्छा होती की, अक्षयने हे सगळे सांभाळावे परंतु आता ही जबाबदारी अमृता सांभाळणार आहे.  काही घटना आणि कारणांमुळे अमृतावर अण्णा नाराज होते आणि तिला घाडगे सदन मधून निघून जाण्यास सांगितले. परंतु अक्षयसाठी घराबाहेर जायला तयार असलेल्या अमृताने आपले मुद्दे अण्णांना पटवून दिले आणि त्यांनी तिला माफ देखील केले. एवढचं नाही तर पुढाकार घेऊन अण्णांनी अमृताला तिचं करिअर करण्याची संधी दिली आहे. त्यानुसार आता अमृता पेढीवर बसून जेमोलॉजिचे धडे घेणार आहे.

 

 अण्णा अमृताला व्यवहार कसा सांभाळावा, व्यवसायामधील छोट्या - मोठ्या गोष्टी अमृताला शिकवणार आहेत असे त्यांनी तिला कबूल केले आहे. पण, आता अमृताची खरी कसोटी लागणार आहे. पेढीवर नवीन शिक्षण घेतानाच अमृता घरातही तितकीच सक्षमपपणे सगळ्या गोष्टी कशा सांभाळणार... घर आणि पेढी सांभाळताना तिची तारेवरची कसरत होणार हे तर नक्की आहे. पण अमृता घाडगेंचे घर आणि पेढी यामध्ये ती कसा समतोल राखणार? माईची तिला यामध्ये कशी साथ मिळणार? घाडगेंचे घर आणि पेढी या दोन्ही गोष्टी सांभाळण्याचे अमृतासमोर आव्हानं आहे. ती कशी स्वत:ला सिद्ध करणार? हे मालिकेत बघणं रंजक असणार आहे. 


पाहुयात, मालिकेच्या लेटेस्ट ट्रॅकची छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...