आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Serial Goth Completes 500 Episodes It's Party Time : 'गोठ'ने गाठला 500 एपिसोड्सचा टप्पा, सेटवर झाले जंगी सेलिब्रेशन

It's Party Time : 'गोठ'ने गाठला 500 एपिसोड्सचा टप्पा, सेटवर झाले जंगी सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्टार प्रवाहच्या 'गोठ' या लोकप्रिय मालिकेने 500 भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 500 भाग पूर्ण केल्यानिमित्त मालिकेच्या सेटवर केक कापून जोरदार सेलिब्रेशनही करण्यात आलं. आता येत्या काही भागांमध्ये आणखी काही नवी वळणं येऊन मालिकेचं कथानक किती रंजक होतं हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

गोठ मालिकेवर प्रेक्षकांनी आजवर भरभरून प्रेम केलं. बयोआजी, अभय म्हापसेकर या खलनायकी व्यक्तिरेखांबरोबरच विलास आणि राधाची जोडी लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांनी तर सोशल मीडियाद्वारे या जोडीचं विरा असं नामकरणही करून टाकलं. इतकंच नाही, तर विलास आणि राधाची जोडी सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरली. गेल्या दोन वर्षांत मराठी टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी गोठ ही एक मालिका आहे. त्यामुळे या मालिकेचे 500 भाग पूर्ण होणं हा निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा गाठल्याबद्दल सेटवर उत्साहाचं वातावरण होतं. सगळ्यांनी एकत्र येऊन केक कापत हा आनंद साजरा केला. 

 

मालिकेचं कथानक आतापर्यंत उत्तम पद्धतीनं सादर करण्यात आल्यानं प्रेक्षक त्यात गुंतून राहिले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या प्रेमाच्या जोरावरच आतापर्यंतची वाटचाल झाली आहे. पुढेही आम्ही प्रेक्षकांना नक्कीच आनंद देत राहू, मालिकेचं कथानक अधिक रंजक करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी भावना विलास आणि राधा अर्थात समीर परांजपे आणि रुपल नंद यांनी व्यक्त केली. 

 

पाहुयात, मालिकेच्या सेटवर झालेल्या सेलिब्रेशनची छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...