आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Telly World : 'गुलमोहर'चे नवीन कथानक ‘आईची सुट्टी’, ही आहे स्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कथेत किशोर चौगुले दिवाकरची तर श्रुजा प्रभुदेसाई दिवाकरची बायको सरलाची भूमिका साकारत आहेत. - Divya Marathi
या कथेत किशोर चौगुले दिवाकरची तर श्रुजा प्रभुदेसाई दिवाकरची बायको सरलाची भूमिका साकारत आहेत.

झी युवा ही वाहिनी नेहमीच युथफूल आणि फ्रेश मालिकांद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आली आहे. 'गुलमोहर' या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या मालिकेने आता पर्यंत त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.  यावेळी गुलमोहर एका आईची व्यथा आगामी 'आईची सुट्टी' या कथेद्वारे सज्ज झाली आहे.

 

ही आहे स्टोरी लाइन... 
कुटुंबासाठी घड्याळाच्या काट्यावर काम करणाऱ्या आईसाठी सुट्टी किती महत्वाची असते, हे या कथेत वर्णले आहे. या कथेत किशोर चौगुले दिवाकरची तर श्रुजा प्रभुदेसाई दिवाकरची बायको सरलाची भूमिका साकारत आहेत.

 

बायको, आई, गृहिणी म्हटलं की प्रत्येक नवऱ्याच्या समोर एकच प्रतिमा उभी राहते ते म्हणजे घरातली कामं जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडणारी हक्काची व्यक्ती. मात्र तिला देखील कधीतरी वाटतं सुट्टी काढून नेहमीपेक्षा वेगळ आयुष्य जगावं, कधीतरी मुलांसोबत नवऱ्यासोबत चार क्षण सुखाचे आरामाचे घालवावेत. पण नवरा थोडा अरसिक असेल तर, अशा वेळी इच्छा असून पण मन मारून जगणाऱ्या स्त्रीची काय अवस्था होत असेल? अशीच अवस्था कथेतील सरलाची आहे. तिला देखील खूप वाटत दुसऱ्याप्रमाणे आपण देखील फॅमिलीसोबत सुट्टीवर जावं पण अरसिक नवरा असल्यामुळे तिची ही इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. तिने कधीही कुठे जायचे ठरवले तरी काहीना काही कारण काढून दिवाकर तो विषय टाळत असे. अशा परिस्थितीत सरला कसा मार्ग काढेल तिला मिळेल का हक्काची सुट्टी? दिवाकर तिला मनापासून फिरायला घेऊन जाईल का? हे  प्रेक्षकांना येत्या सोमवारी आणि मंगळवारी 'गुलमोहर'मध्ये बघायला मिळणार आहे.  

 

पुढील स्लाईडवर बघा, मालिकेतील कलाकारांची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...