आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Serial Laxmi Sadaiva Mangalam Latest Track Telly World : लक्ष्मीच्या हातावर लागली मेंदी, मामीची कारस्थानं सुरुच

Telly World : लक्ष्मीच्या हातावर लागलेली मेंदी कुणाच्या नावाची! मामीची कारस्थानं सुरुच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील 'लक्ष्मी सदैव मंगलम्' या मालिकेमध्ये सध्या लक्ष्मीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. लक्ष्मी सुध्दा बरीच आनंदी आहे कारण, आता तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार लवकरच मिळणार आहे. दारी मंडप सजल आहे, लग्नाची लगबग सुरु झाली आहे. लक्ष्मी लवकरच तिच्या नव्या आयुष्यात पाउल ठेवणार आहे, दारी नवर देवाची वरात येणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये मामीची कारस्थानं सुरुच आहेत. यासाठीच आता लक्ष्मीच्या हाताला मेंदी आज मेहेंदी लागणार आहे. त्यातलेच काही क्षण आणि लक्ष्मीचा आनंद तुम्ही या फोटोमध्ये मध्ये बघू शकता. 


नवरी मुलीच्या हाताला मेंदी लावताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावं लिहितात असं म्हणतात ... लक्ष्मीचा हात कोणाच्या हाती जाईल ? तिच्या स्वप्नातला राजकुमार कोण असेल ? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहेत.


तेव्हा बघायला विसरू नका लक्ष्मीचा मेंदीचा सोहळा आज संध्या. 7.00 वाजता आणि लक्ष्मीचा विवाहसोहळा लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये 11 जून ते 16 जून संध्या. 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, नवीन आयुष्याची स्वप्न रंगवणा-या लक्ष्मीच्या मेंदी सोहळ्याची खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...