आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : रेवती आणि सुबोध अडकले लग्नाच्या बेडीत, तुम्ही पाहिलेत का हे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. राधिकाची बेस्ट फ्रेंड अर्थातच रेवतीने अखेर लग्नाला होकार दिला आहे. घटस्फोटित रेवतीने सुबोध गुप्तेची जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. तिच्या या निर्णयाने राधिकासह सोसायटीतील सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. त्यामुळे सध्या राधिका आणि नानांच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.

 

सुबोध आणि रेवतीच्या हळदीच्या कार्यक्रमानंतर आता लग्नविधींना सुरुवात झाली आहे. पिवळ्या रंगाच्या नऊवारीत रेवती अतिशय सुंदर दिसतेय. तर निळ्या रंगाच्या कुर्त्यात नवरदेवही शोभून दिसतोय. गुरुनाथ सुभेदारच्या ऑफिसमध्ये काम करणारा आनंद रेवतीच्या भावाची भूमिका वठवतोय. आनंद, जेनी, श्रेयस, समिधा यांनी रेवती-सुबोधच्या लग्नाला हजेरी लावली आहे. पण गुरुनाथ आणि शनाया यांनी मात्र या लग्नाला उपस्थिती लावण्याचे टाळले आहे.

 

या मालिकेत अभिनेत्री श्वेता मेहंदळेने रेवतीची तर यश पटवर्धनने सुबोध गुप्तेची भूमिका वठवली आहे. तर अनिता दाते-केळकर ही राधिका, रसिका सुनील ही शनायाच्या तर अभिजीत खांडकेकर गुरुनाथच्या भूमिकेत झळकत आहेत. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, रेवती-सुबोधच्या लग्नाचे निवडक Photos...

बातम्या आणखी आहेत...