आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​Telly World : बोहल्यावर चढणार वैदेही, जाणून घ्या कुणासोबत बांधणार आहे लगीनगाठ!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी युवा वाहिनीवरील मंदार देवस्थळी दिग्दर्शित  'फुलपाखरू' ही मालिका महाविद्यालयीन मुलांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. महाविद्यालयीन आयुष्यातील पहिले प्रेम, हे कोणत्याही महाविदयालयातील तरुण तरुणीच्या  अगदी मनातील जवळचा विषय असतो. त्यात मानस आणि वैदेहीसारखी गोड जोडी आणि त्यांची अनोखी प्रेमकहाणी सगळ्यानांच भावली.

 

अल्पावधीतच फुलपाखरू मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन झाली आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. नुकतेच या मालिकेने वर्षपूर्ती करून आपण किती लोकप्रिय आहोत हेच दाखवून दिले. पण या मालिकेत आता जे घडणार आहे त्यामुळे या दोघांवर मनापासून प्रेम करणाऱ्या असंख्य मुलामुलींचे हृदय तुटणार आहे.  तर काही जणांचा आनंद गगनात मावणार नाही आहे. एकमेकांवर अतोनात प्रेम करणाऱ्या वैदेही मानसचं लग्न ठरलं आहे. २९ जुलै दुपारी १२ वाजता आणि ७ वाजता छोट्या पडद्यावरील हा भव्य विवाह सोहळा झी युवावर पाहायला मिळेल आणि २३ जुलै  ते २८ जुलै रोज रात्री ९ वाजता लग्नसराई ची जंगी तयारी संपूर्ण आठवडाभर गाजेल. 

 

कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे - फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे 'फुलपाखरू'. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. वैदेही आणि मानस यांच्या प्रेमकथेतील अनेक चढ उतारानंतर आता हे दोघेही लग्नबेडीत अडकणार आहेत. महाविद्यालयीन प्रेम हे फार कमी प्रमाणात घरापर्यंत पोहोचते आणि त्याहूनही कमी जोडप्यांचे प्रत्यक्षात लग्न होते. फुलपाखरू मालिकेत प्रेमाचे हे सर्व टप्पे अतिशय सुंदरतेने दाखवले गेले आणि आता त्यांच्या नात्याला मिळणारे हे नवीन रूप लोकांच्या लोकप्रियतेचे शिखर गाठेल.

 

येत्या काही भागात वैदेही आणि मानस यांची लगीनघाई प्रेक्षक पाहू शकणार आहे. दोन्ही घरात लग्नाची लगबग आणि खरेदी सुरु होणार आहे. वैदेहीला आई नसल्यामुळे मानसची आई वैदेहीला लग्नाचा पोशाख घेण्यात मदत करणार आहे. दोन्ही कुटंबे त्यांची घरे सजवून लग्नाच्या तयारीला सुरूवात करतील. कुटुंबीय आणि मित्रपरिवार हा लग्न सोहळा तसेच संगीत, मेंदी आणि इतर समारंभ कसे दिमाखदार करता येतील या तयारीत असतील. लग्नाच्या गाठी स्वर्गातबांधल्या जातात आणि मानससारख्या जोडीदारासोबत देवाने वैदेहीची गाठ बांधली आहे त्यामुळे हा भव्य लग्नसोहळा झी युवावर पाहणे हे प्रेक्षकांनासाठी एक पर्वणीच असेल.  

 

बातम्या आणखी आहेत...