आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

It's Party Time : 'राधा प्रेम रंगी रंगली'चे 200 भाग पूर्ण, सेटवर झाले जंगी सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील “राधा प्रेम रंगी रंगली” ही मालिका सुरु झाल्यापासूनच मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, उत्तम कथानक, कलाकार तसेच आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधाने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील, कविता लाड, गौतम जोगळेकर, या सगळ्यांनाच प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतं आहे.

 

सध्या मालिकेमध्ये आलेल्या रंजक वळणाने मालिकेबद्द्लची उत्सुकता अजुनची वाढली आहे. राधा प्रेमा म्हणून आनंद नाडकर्णी यांच्या इस्पितळात काम करत आहे. तसेच राधा गरोदर असल्याचे सत्य फक्त माधव निंबाळकर यांना माहिती आहे जे राधानेच सांगितले आहे. आता मालिकेमध्ये विश्वनाथ यांनी प्रेमला देवयानीच्या कारस्थानाबद्दल सांगितले आहे. आता पुढे प्रेम कसे देवयानीचे हे कारस्थान मोडून काढेल ? कशी राधा आणि प्रेमची भेट होईल ? मालिकेमध्ये पुढे कुठले रंजक वळण येणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तसेच कमी कलावधीत यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच या मालिकेने 200 भाग पूर्ण केले आहेत.

 

या मालिकेतील सर्वच कलाकारांनी 200 एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापला आणि एकत्र जेवण देखील केले. कलाकारांना झालेला आनंद त्यांच्या फोटोमधून दिसते आहे. याचबरोबर मालिकेमध्ये येत्या काही भागांमध्ये बरेचसे ट्वीस्ट येणार आहेत. जर राधा आणि प्रेमची भेट झाली तर राधाला कळलेले सत्य ती प्रेमला सांगणार का ? देवयानी आता कोणती खेळी खेळणार ? हे बघणे रंजक असणार आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, सेटवर झालेल्या जंगी सेलिब्रेशनची खास झलक छायाचित्रांमध्ये.. 

बातम्या आणखी आहेत...