आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध मराठी गायिकेने बदलले नाव, 'ये रिश्ता...'सह अनेक मालिकांसाठी केले आहे पार्श्वगायन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेक्सपिअर म्हणाला होता की नावात काय आहे ? सध्याच्या इंटरनेटच्या युगात या नावांचा ट्रेंड फारच रुजू लागला आहे. अनेक सोशल साईटवर तरुणाईचा आपल्या नवीन नावांचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे.  मराठी सिनेसृष्टी या ट्रेंडमध्ये मागे कशी राहील. मध्यंतरी शर्मिला शिंदे या अभिनेत्रीने आपलं नाव शर्मिला शिंदे याऐवजी शर्मिला राजाराम असं नामकरण केलं आहे. या यादीत आता आणखी एका कलाकाराचं नाव ऍड झालं आहे. हे नाव म्हणजे कविता निकम या गायिकेचे.

 

होय, या गायिकेने आपले नाव कविता राम असे केले आहे. याबद्दल तिला विचारले असता तिने सांगितले, ''वडील हे प्रत्येक मुलींसाठी सुपरमॅन असतात, आयुष्यभर आपण त्यांच्या नावाने ओळखले जावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मला ही माझी ओळख माझ्या वडिलांपासून हवी होती, म्ह्णून मी माझ्या नावापुढे वडिलांच नाव लावून नामकरण केलं." 

 

कविता निकम यांनी आतापर्यंत अनेक हिंदी मालिका तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे. कविता यांनी "ये रिश्ता क्या कहलाता है", "गोदभराई", "मेरे घर आयी एक नन्हीं परी", "कैरी", " साथ निभाना साथिया"  या मालिकांसाठी  पार्श्वगायन केले आहे.

 

पुढे वाचा, आणखी कोणकोणत्या मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी केलंय कविता यांनी पार्श्वगायन... 

बातम्या आणखी आहेत...