आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: झी चित्र गौरवच्या रेड कार्पेटवर अवतरले ग्लॅमर, माधुरी दीक्षितसह पोहोचले हे स्टार्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शुक्रवारी रात्री मुंबईत झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी स्टार्सचा ग्लॅमरस अंदाज लक्षवेधी ठरला. आगामी 'बकेटलिस्ट' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झालेली अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मराठमोळा लूक यावेळी बघायला मिळाला. निळ्या रंगाच्या काठापदराच्या साडीत माधुरीचे सौंदर्य खुलले होते.

 

अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर, चिन्मयी सुमीत, मिथिला पालकर या अभिनेत्रींसोबतच मराठी अभिनेतेही डॅशिंग लूकमध्ये दिसले. अभिनेता अमेय वाघ, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ जाधव, सचिन खेडेकर, हेमंत ढोमे, शशांक केतकर यांच्यासह अनेक मराठी स्टार्स यावेळी रेड कार्पेटवर पोहोचले होते. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या मराठी स्टार्सची खास झलक...

बातम्या आणखी आहेत...