आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्ती बर्वेंपासून ते आनंद अभ्यंकारांपर्यंत, अपघाताने हिरावून नेले मराठी सिनेसृष्टीचे मौल्यवान हिरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकलाकार ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या भक्ती बर्वे यांची आज 17 वी पुण्यतिथी. 10 सप्टेंबर 1948 रोजी मुंबईत भक्ती यांचा जन्म झाला होता. भक्ती यांनी केवळ मराठीतच नव्हे तर गुजराती आणि हिंदी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. 12 फेब्रुवारी 2001 रोजी वाई येथून मुंबईला परततांना भक्ती बर्वे यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते.

 

लहानपणापासून होती अभिनयाची आवड...

भक्ती बर्वे यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल. त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. 'ती फुलराणी' हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. 'ती फुलराणी' चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. 'आई रिटायर होतेय' या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या मराठी कलाकारांचा अपघाती मृत्यू झाला होता...

बातम्या आणखी आहेत...