आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: नाना पाटेकरांमुळे मिळाला होता \'मक्या\'ला पहिला चित्रपट, असे समजले होते सुपरस्टार झाल्याचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीत असे काही कलाकार असतात, जे त्यांच्या जन्मभूमीमुळे ओळखले जातात. असाच एक कलाकार म्हणजे सुपरस्टार मकरंद अनासपुरे.  'मक्या' या नावाने ते प्रसिद्ध आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते मराठीतील सुपरस्टार झाले आहेत. मराठवाडा आणि येथील भाषेचा ठसा उमटवणारे मकरंद खर्‍या अर्थाने मराठवाड्याचे हीरो आहेत. कायद्याच बोला, गाढवाचं लग्न, दे धक्का, उलाढाल, जबरदस्त, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, भारतीय अशा अनेक सिनेमांतून मकरंद यांनी आपल्या खास संवाद शैलीने, वेगळ्या बाजाने आपला ठसा उमटवला आहे. आज (22 जुलै) या सुपरस्टारचा वाढदिवस आहे. मकरंद यांनी वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. 

 

आज मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टारच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही त्यांच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत, मकरंद यांचे फॅमिली फोटोज आणि सोबत सांगतोय या सुपरस्टारचा स्ट्रगल आणि बरंच काही... 

 

- मकरंद अनासपुरे यांचा जन्म 22 जुलै 1973 रोजी औरंगाबाद येथे झाला. शिल्पा अनासपुरे हे त्यांच्या पत्नीचे नाव असून 30 नोव्हेंबर 2001 रोजी औरंगाबाद येथे दोघांचे पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. इंद्रायनी हे मुलीचे तर इंद्रनील हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. शिल्पा आणि मकरंद यांचा प्रेमविवाह आहे. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान दोघांची भेट झाली आणि या भेटीचे रुपांतर लग्नात झाले. 

 

- औंरगाबाद येथून मकरंद यांनी नाट्यशास्त्रात पदवीप्राप्त केली. औरंगाबादेत सुमारे 400 ते 500 पथनाट्य केली. नाना पाटेकरांचा 'अंकुश' हा सिनेमा मकरंद अनासपुरेंनी तब्बल 26 वेळा पाहिला होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ 11 वर्षे होते. थिएटरमधील लोकसुद्धा त्यांना ओळखायला लागले होते.  

 

- महाविद्यालयात असताना बॉटनी हा त्यांचा विषय होता. अॅक्टर झालो नसतो तर बीएस्सी, एमस्सी केलं असतं आणि पीचएडी करुन वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक म्हणून कुठे जॉईन झालो असतो, असे मकरंद म्हणतात.  

 

- नाना पाटकेरांनी मकरंद यांना मुंबईत येण्याचे सुचवले होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे मुंबईत आल्यानंतर अनेक दिवस त्यांना आमदार निवासात काढावे लागले होते. घरातून पाचशे रुपये घेऊन मकरंद मुंबईत आले होते. त्यानंतर घरातून पैसे घ्यायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. मुंबईत पाऊल ठेवल्या-ठेवल्या त्यांचा पहिला स्ट्रगल सुरु झाला होता आणि तो म्हणजे आमदार निवास शोधण्याचा. सीएसटीपासून आमदार निवास शोधायला त्यांना अडीच तास लागले होते.

 

- मुंबईत आल्यानंतर वर्षभर त्यांनी नाना पाटेकरांची भेट घेतली नव्हती. त्याचे कारण म्हणजे त्यांचा मित्र आणि अभिनेता मंगेश देसाईने त्यांना म्हटले होते, की मी मुंबईत आल्यानंतर आपण दोघे मिळून पाटेकरांची भेट घेऊ. पण वर्षभर मंगेश मुंबईत आलेच नाहीत. त्यामुळे मकरंद यांनी मंगेश यांना दिलेली कमिटमेंट पाळली आणि वर्षभराने मंगेश मुंबईत आल्यानंतर दोघांनी जाऊन नानांची भेट घेतली होती.   

 

- याकाळात मकरंद देशपांडे मुंबईत कामाच्या शोधात होते. केदार शिंदेंनी त्यांना मराठवाड्यात एका नाटकात पाहिले होते. मकरंद केदार शिंदेंना जाऊन भेटले. त्यांच्या मदतीने मकरंद यांना सुयोग संस्थेच्या 'झालं एकदाचं' या नाटकात काम करण्याची संधी दिली. मुंबईत आल्यानंतर हे त्यांचे पहिले नाटक होते. या नाटकात त्यांना सात मिनिटांचा रोल मिळाला होता. विशेष म्हणजे समीक्षकांनी त्यांच्या भूमिकेची दखल घेतली होती.   

 

पुढे वाचा, मकरंद यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी आणखी बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...