आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: \'भाई व्यक्ती की वल्ली\' या चित्रपटाच्या लाँचला राज ठाकरेंसह या सेलेब्सची उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर पुलंचं आयुष्य मोठ्या पडद्यावर आणत आहेत. नुकतीच मुंबईत या चित्रपटाची घोषणा झाली. भाई व्यक्ती की वल्ली असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात पूलंच्या भूमिकेत अभिनेता सागर देशमुख असून सुनीताबाईंची भूमिका अभिनेत्री इरावती हर्षे साकारत आहे. पुढील वर्षी 4 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

12 जून रोजी पुलंचा स्मृतीदिन होता. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 11 जून रोजी मुंबईत या चित्रपटाची घोषणा झाली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे पत्नी शर्मिलासह उपस्थित होते. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. भाऊ कदम, स्वानंद किरकिरे, भारती आचरेकर, वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, जयवंत वाडकर, अभिजीत चव्हाण, बिग बॉस मराठी या शोमधून अलीकडेच बाहेर पडलेला सुशांत शेलार, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, विजू माने, शिवाजी साटम, सचिन खेडेकर, सागर कारंडे यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. 

 

पाहुयात, या सोहळ्याची खास क्षणचित्रे पुढील स्लाईड्सवर...

 

 

बातम्या आणखी आहेत...