आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री चिन्मयी सुमीतसमोर हस्तमैथुनाचा प्रयत्न, दोन तासांत विकृत कारचालकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवनची पत्नी अभिनेत्री चिन्मयी सुमीतकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या विकृत कारचालकाला मुंबई पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अटक केली. सुमीतने पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासांत मुंबई पोलिसांनी विकृत कारचालकाला बेड्या ठोकल्या.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

चिन्मयी सुमीतसोबत विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक शाळेजवळ सोमवारी सकाळी हा विकृत प्रकार घडला होता. पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा चालक बसला होता. त्याने चिन्मयी सुमीतकडे पाहून अश्लील चाळे करुन हस्तमैथून करायला सुरुवात केली होती. त्याला धडा शिकवण्यासाठी चिन्मयी धाडसाने पुढे सरसावली पण त्याचवेळी तो तिथून निसटला. 

 

सुमीतने ट्वीटच्या माध्यमातून फोडली वाचा...

या सगळ्या प्रकाराला सुमीतने ट्विटरवरून वाचा फोडली आणि एकच संताप व्यक्त झाला. अश्लील चाळे करणारी व्यक्ती बीएमडब्ल्यू कारचा ड्रायव्हर आहे. त्याच्या कारचे शेवटचे 4 नंबर 1985 असल्याचे सुमीतने त्याच्या  ट्वीटमध्ये सांगितले होते. आरोपीने करड्या रंगाचा सफारी घातला असून कार नंबरच्या आधारे त्याचा शोध घ्या, असे आवाहन सुमीतने त्याच्या पोस्टमधून पोलिसांना केले होते. ट्विटमध्ये सुमीतने मुंबई पोलिसांनाही टॅग केले होते.

 

दोन तासांत आरोपी गजाआड...

सोमवारी सायंकाळी 4.15 वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली व अवघ्या दोन तासांत या विकृत चालकाला अटक करण्यात आली. या इसमाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. 

 

सुमीतने मानले पोलिसांचे आभार...

पोलिसांच्या कारवाईबाबत सुमीतने ट्वीटद्वारे माहिती दिली असून विलेपार्ले पोलिस स्टेशन व मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. अशा घटना तुमच्या डोळ्यापुढे घडत असतील तर कृपा करून त्या सहन करू नका, त्यावर व्यक्त व्हा, पोलिसांकडे जा, असे आवाहनही सुमीतने ट्वीटद्वारे केले आहे. 

 

पुढे वाचा, सुमीत राघवनचे ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...