आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या नव-याची बायको' फेम सचिनने बालीमध्ये साजरा केला हनीमून, शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'होणार सून मी ह्या घरची', 'माझ्या नव-याची बायको' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सचिन देशपांडे 6 मे रोजी पियुषा बिन्दुरसोबत लग्नाच्या बेडीत अडकला. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. लग्नानंतर हे नवविवाहित दाम्पत्य बाली येथे हनीमूनसाठी गेले होते. सचिनने अलीकडेच त्याच्या हनीमूनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पत्नी पियुषासोबतचे बाली येथील फोटो शेअर करुन सचिनने लिहिले, "Being with u is the best thing ever.....😘😘😘😘😘😘#bali#fun#sukhsama😘😘😘"

 

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत सचिनने मनिषची भूमिका केली होती. आता 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत सचिन श्रेयसची व्यक्तिरेखा साकारतोय. त्याने अनेक मराठी नाटकांतही काम केले आहे. तर सचिनची पत्नी पियुषा 'घरचं जेवण आईच्या हातचं' या हॉटेलची मालकीण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पियुषा या व्यवसायात आहे.

 

उखाणा शेअर करुन सचिनने दिली होती लग्नाची बातमी... 
लग्नाच्या दुस-या दिवशी सचिनने त्याच्या फेसबुक पेजवर एक छानसा उखाणा लिहून लग्नाची बातमी चाहत्यांना दिली होती. 
आमच्या नात्याची गाठ 
देवानेच कुठेतरी बांधली असेल
पियूषाला सुखात ठेवण्यासाठी
मला जन्मायची संधी दिली असेल...

सचिनच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सनी खूप साऱ्या लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या. 
 

'माझ्या नवऱ्याची बायको'च्या सेटवर झाले होते खास केळवण
सचिन आणि पियुषाला 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या सेटवर खास केळवण देण्यात आले होते. यावेळी राधिका सुभेदार, गुप्ते भाऊ आणि रेवती यांच्यासोबतचे खास फोटो पियुषाने शेअर केले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, सचिनने शेअर केलेले पत्नी पियुषासोबतचे बाली येथील खास Photos... 

बातम्या आणखी आहेत...