आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या चाळीशीतही फारच ग्लॅमरस आहे 'माझ्या नवऱ्याची..' फेम 'रेवती', पतीही आहे प्रसिद्ध अभिनेता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क -  'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रेवती अर्थात अभिनेत्री श्वेता मेहेंदळे तिच्या भूमिकेमुळे लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत रेवतीची सिंगल पॅरेंट भूमिका करणारी श्वेता जरी मुख्य भूमिकेत नसली तरीही सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मालिकेत ती मि. गुप्ते म्हणजेच यश पटवर्धनची लव्ह इंटरेस्ट दाखवण्यात आली आहे. पण खऱ्या आयुष्यात हे दोघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. श्वेता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते आणि तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मालिकेत साध्या रुपात दिसणारी श्वेता खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस आहे. 

 

श्वेता मराठी मालिकांमधील ओळखीचा चेहरा आहे. तिने अनेक मालिका तसेच चित्रपटातही काम केले आहे. श्वेता अभिनेता राहुल मेहेंदळेची पत्नी आहे. राहुलने पोश्टर बॉईज यांसारख्या चित्रपटात भूमिका केली आहे. श्वेताची असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मराठी मालिकेतील भूमिका लोकप्रिय झाली होती. 2013 साली आलेली या मालिकेने त्यावेळी टीआरपी गाठला होता. 

अभिनयाशिवाय श्वेताला डान्स आणि कुकिंगची फार आवड आहे. श्वेता स्वतःला ती एक घरगुती मुलगी असल्याचे सांगते जिला संपूर्ण कुटुंबाला स्वयंपाक करुन खाऊ घालणे आवडते. श्वेता तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटोही शेअर करत असते. श्वेता एका मुलाची आई आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, श्वेता मेहेंदळेचे सोशल मीडिया अकाउंटवरील काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...