आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्याची दुसरी इनिंग सुरु करणार '..नवऱ्याची बायको' फेम गुप्ते-रेवती, सेटवर अशी करतात मौजमस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया-गुरुनाथ यांच्याव्यतिरीक्त एक जोडी सर्वांचे लक्ष वेधते ते म्हणजे मि. गुप्ते आणि रेवती. एका मुलीची आई असलेली रेवती घटस्फोटीत आहे. एकाच अपार्टमेंटमध्ये राहणारे रेवती आणि राधिका एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी आहेत. त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणारा मि. गुप्ते आणि रेवती एकमेकांवर प्रेम करतात पण ते बोलण्याचे धाडस त्यांनी केले नाही. रेवतीप्रमाणेच मि. गुप्ते मालिकेत घटस्फोटीत दाखवण्यात आले आहे पण आता अखेर गुप्ते यांनी त्यांचे रेवतीवरील प्रेम व्यक्त केले आहे आणि रेवतीने त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारला असून दे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

 

आता मालिकेतील रेवती म्हणजेच श्वेता मेहेंदळे आणि मि. गुप्ते म्हणजेच यश पटवर्धन मालिकेत एकमेकांचे लव्ह इंटरेस्टची भूमिका करतात पण खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. दोघेही सेटवरील एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. गेट टुगेदरमध्ये तसेच सेटवरही त्यांच्यातील निखळ मैत्री दिसून येते. या दोघांच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीला बेस्ट फ्रेंडची अजून एक जोडी मिळाली आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, यश पटवर्धन आणि श्वेता मेहेंदळे यांचे  काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...