आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या नव-याची बायको' मालिकेत सिंगल असणारा 'श्रेयस' अडकला लग्नाच्या बेडीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत 'सिंगल' स्टेटस मिरवणा-या श्रेयसला अर्थात अभिनेता सचिन देशपांडेला आयुष्याची जोडीदार गवसली आहे. नुकताच तो विवाह बंधनात अडकला. सचिनच्या पत्नीचे नाव पियुषा बिद्नुर असे आहे. मनिष आणि पियुषा या दोघांनी आपल्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत झळकला होता
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत सचिनने मनिषची भूमिका केली होती. यानंतर त्याने अनेक मराठी नाटकांतही काम केले आहे. सध्या तो 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत काम करतोय. तर सचिनची पत्नी पियुषा 'घरचं जेवण आईच्या हातचं' या हॉटेलची मालकीण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पियुषा या व्यवसायात आहे.


पुढील स्लाइडव क्लिक करुन पाहा सचिन आणि पियुषाच्या लग्नाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...