आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBDay9:मेधाच्या डोक्यावर घराच्या कॅप्टनसीचा ताज, सई-रेशमला हरवत अशी बनली कॅप्टन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस मराठीमध्ये आस्ताद काळेनंतर मेधा धाडे ही कॅप्टनपदी विराजमान झाली आहे. बिग बॉसने दिलेल्या कॅप्टनसी विंग या टास्कमध्ये सई आणि रेशमला हरवत मेधा धाडे या आठवड्याची कॅप्टन बनली आहे. या टास्कनुसार सई- मेधा आणि रेशम यांना बिग बॉसने दिलेली कॅप्टनसी विंग हातात धरुन ठेवायची होती. जो उमेदवार ती रिंग सोडेल तो या खेळातून बाद होईल असे या खेळाचे स्वरुप होती. रेशमने सोडली सर्वप्रथम रिंग..


या टास्कची सुरुवात झाली तेव्हा सई आणि मेधा यांनी गाणे गात स्वतःचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली. रेशम यामुळे थोडी अस्वस्थ झाली होती. त्यानंतर रेशमचा घरातील खास मित्र राजेश याने रेशमला खेळ सोडण्यासाठी सांगितले आणि त्यानंतर रेशमने रिंग सोडली. ही रिंग सोडताना रेशमने तिला कॅप्टनसी पदासाठी रिंगची गरज नाही असे सांगितले. सई-मेधा यांनी सकाळी 4 पर्यंत केला टास्क...

रेशमने टास्क सोडल्यावर घरातील एकमेकांच्या खास मैत्रिणी सई आणि मेधा यांनी सुमारे चारपर्यंत हा टास्क पूर्ण केला. सईने आणि मेधाने यादरम्यान कितीतरी वेळ एकमेकांसोबत घालवला आणि यादरम्यान त्यांनी रात्री मॅगी बनविणे, नृत्य करणे यांसारखे कामे करत लोकांचे आणि स्वतःचेही मनोरंजन केले. रात्रीवेळी त्यांच्यावर मॉनिटरींग करण्याची वेळ अनिल थत्ते यांच्यावर होती. 

सईने सकाळी चार वाजता नैसर्गिक विधीमुळे हा टास्क पूर्ण केला नाही आणि मेधाला विजयी करत तिचे अभिनंदन केले. मेधानेही बिग बॉसने दिलेली कॅप्टनसीपदाची कमान लीलया पेलणार असे बिग बॉसला आश्वासन दिले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कॅप्टनसी विंग टास्कदरम्यान घरातील सदस्यांचे तसेच इतर काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...