आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमरस रुपात दिसली 'माझ्या नवऱ्याची..'फेम संजना, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत काही एपिसोडपुरताच आलेली संजना अर्थातच मीरा जगन्नाथने लोकांचे चांगेल लक्ष वेधले होते. मालिकेत या नव्या संजनामुळे गॅरी-शनायाचे ब्रेकअप होते की काय, असे सर्वांनाच वाटत होते पण तसे न होता संजनानेच मालिकेतून एक्झिट घेतली आहे. याच संजनाने म्हणजे मीराने सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केला आहे. त्यात ती फारच ग्लॅमरस रुपात दिसत आहे.

 

थोड्याच कालावधीसाठी आलेल्या संजनाची गॅरीसह ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांनाही भूरळ पडली होती. पण आता कथेच्या मागणीनुसार मीराने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. पण मालिकेतील कामामुळे तिची फॅन फॉलोईँगही वाढली आहे. मीरा सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह आहे आणि नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच तिने तिचा विदाऊट मेकअप फोटो शेअर केला आहे त्यात की मेकअपविनाही किती आकर्षक दिसते हे कळते.

अभिनेत्री दीप्ती देवीसोबत केले होते इंटीमेट फोटोशूट...
अभिनेत्री दीप्ती देवीसोबत मीरा जगन्नाथने इंटीमेट फोटोशूट केले होते. या फोटोशटने सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते. मीरा जगन्नाथ मॉडेलिंग क्षेत्रात अॅक्टीव्ह आहे. तिचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिल्यावर ते कळतेच.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मीरा जगन्नाथचे काही खास PHOTOS...