आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिक्स पॅक अॅब्ज असलेला रांगडा हिरो ‘जीत’ करतोय मराठी इंडस्ट्रीत Debut, आता करणार 'फाइट'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन ते अगदी टायगर श्रॉफ पर्यंत अनेक सिक्स पॅक्स असलेले हीरो आहेत. पण आता मराठीतही सहा फुट उंच आणि सिक्सपॅक अॅब्ज असलेला हीरो डेब्यु करतो आहे. या हँडसम हंकचे नाव आहे, जीत. जीत लवकरच फ्युचर एक्स प्रॉडक्शन्स आणि जे सेव्हन प्रोडक्शन्सच्या ‘फाइट’ या मराठी अॅक्शनपटातून फिल्म इंडस्ट्रीत डेब्यु करत आहे.

 

फाइट सिनेमाचे दिग्दर्शक जीमी मोरे सांगतात, “बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक अॅब्ज असणारे हीरो आहेत. त्यामुळे तिथे अॅक्शनपटही बनतात. मराठीत असलेल्या हीरोंचा बांधा पाहता, असे सिनेमे मराठीत येऊ शकत नाहीत. त्यामुळेच स्वप्नील महालिंगने लिहिलेली ही 'फाइट' फिल्म दिग्दर्शित करायचे मी ठरवले, तेव्हा मला अशा हीरोचा शोध होता. जो चांगलाच उंचापुरा असेल आणि त्याची बिल्टही चांगली असेल.”

 

'जीत'विषयी सांगताना जीमी मोरे म्हणतात, “जीतचा रस्टिक लूक त्याचप्रमाणे त्याची पिळदार देहयष्टी हा सिनेमाचा महत्वाचा भाग आहे. या सिनेमातल्या फाइट्सही त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वामूळे वास्तववादी वाटतील.”

 

पुढे बघा, मराठी इंडस्ट्रीतील नवीन अॅक्शन हीरो जीत मोरेचा लूक...

बातम्या आणखी आहेत...