आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Family: 17 वर्षांची आहे सुमीतची लेक, व्हायचे आहे सिनेमॅटोग्राफर, मुलगा आहे पिआनिस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बकेट लिस्ट' हा चित्रपट उद्या म्हणजेच 25 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातून बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याने सगळ्यांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे. या चित्रपटात माधुरीने सर्वसामान्य गृहिणीची भूमिका वठवली आहे, तर तिच्या पतीच्या भूमिकेत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील   हॅण्डसम हंक सुमीत राघवन. सुमीत आणि माधुरीची एक मुलगी असल्याचे चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. पहिल्यांदाच माधुरीसोबत काम करण्याची संधी सुमीतला मिळाली आहे. 

 

ख-या आयुष्यात दोन मुलांचा बाबा आहे सुमीत...

22 एप्रिल 1971 रोजी जन्मलेल्या सुमीत राघवनने वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीपासून सुमीत अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. बालकलाकार म्हणून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले. अभिनेत्यासोबतच तो एक उत्कृष्ट गायकदेखील आहे. शास्त्रीय संगीताचे त्याने धडे गिरवले आहेत. व्हॉइस आर्टिस्ट, होस्ट म्हणूनही तो कार्यरत आहे. मराठी नाटकं, सिनेमांसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये सुमीतने स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. 

 

22 वर्षांपूर्वी चिन्मयी सुर्वेसोबत थाटले लग्न... 

1996 मध्ये अभिनेत्री चिन्मयी सुर्वेसोबत सुमीत विवाहबद्ध झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नीरद हे त्यांच्या मुलाचे तर दीया हे मुलीचे नाव आहे. नीरद ग्रॅज्युएट असून 21 वर्षांचा आहे. पिआनिस्ट म्हणून नीरदने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संगीतकार म्हणूनही तो नाव कमावत आहे. 

 

17 वर्षांची आहे सुमीतची लेक...

सुमीत आणि चिन्मयी यांची लेक दीया ही 17 वर्षांची असून याचवर्षी तिने 12वीची परीक्षा दिली आहे. दीयानेलादेखील वडिलांप्रमाणे गाण्याची आवड असून तिने संगीताचे धडे घेतले आहेत. तिला फोटोग्राफीची विशेष आवड असून भविष्यात सिनेमॅटोग्राफर व्हायचे तिचे स्वप्न आहे. 

 

या पॅकेजमधून बघुयात, सुमीत राघवनच्या कुटुंबाचे खास PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...