आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस फेम मेघा धाडे आहे बिग बॉस कार्यक्रमाची मोठी चाहती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याचा त्याचा चाहता वर्ग आहे. कोणी सदस्यांनी तो चाहता वर्ग या कार्यक्रमामधून कमावला आहे. प्रेक्षकांनी देखील त्यांचे आवडते, लाडके स्पर्धक एव्हाना निवडले आहेत. सदस्यांची वागणूक, ते कशाप्रकारे टास्क करतात, ते घरातील इतर सदस्यांशी कसे वागतात, त्यांचे इतर सदस्यांसोबत नाते संबंध कसे आहेत अशा बऱ्याच गोष्टींचा विचार प्रेक्षकवर्ग रोज करत असतो. बिग बॉस मराठीच्या घरातील कॅमेरा तर आहेतच पण हे सदस्य प्रेक्षकांच्या देखील नजरकैदेत असतात असे म्हणायला हरकत नाही. कोणत्या सदस्यांनी कसा टास्क केला, तो आपली टीमशी वा स्वत:शी किती प्रामाणिक आहे हे सगळेच प्रेक्षकांना माहिती असते.

 

बिग बॉस मराठीच्या घरातील अशीच एक सदस्य मेघा धाडे हिने आपल्या स्पष्ट बोलण्याने, खऱ्या वागणुकीने, तिचे सई, पुष्कर आणि आऊ यांच्याशी पहिल्या दिवसापासून असलेल्या निखळ मैत्रीने मेघाने प्रेक्षकांची मने आता जिंकायला सुरुवात केली आहे असे म्हणायला हरकत नाही. मेघाने बिग बॉसच्या पहिल्या भागापासून हे सांगितले आणि कबूल केले आहे कि ती बिग बॉसची किती मोठी चाहती आहे. तिने हिंदी भाषेतील बिग बॉसचे सगळे सिझन न चुकता पाहिले आहे. आणि त्यामुळेच बिग बॉस मराठी मध्ये भाग घ्यायची तिची मनापासून इच्छा होती.

 

बिग बॉस मराठीच्या घरातील मेघाची टास्क करण्याची जिद्द असो वा हा सिझन जिंकण्यासाठी जिद्द असो, किचन मध्ये वेगवेगळे पदार्थ करणे असो, वा घराची सफाई असो सगळी कामे ती निष्ठेने करते. मेघाचे हा कार्यक्रमावर इतके प्रेम आहे कि, “ती तिच्या मानलेल्या नवऱ्याच्या घरी आली आहे... सासरी आले आहे मी” असे ती पहिल्यादिवशी कौतुकाने म्हणाली होती.

सई, मेघा, भूषण, आऊ पुष्कर, रेशम सगळेच हा खेळ खूप छान खेळत आहेत. प्रेक्षक यांच्यावर मनापासून प्रेम करत आहेत. त्यामुळे हा बिग बॉस मराठीचा पहिला सिझन कोण जिंकेल ? हे बघणे रंजक असणार आहे. कारण या घरामध्ये आलेला प्रत्येकच स्पर्धक जो आता या घराचा सदस्य बनला आहे त्याची हीच इच्छा आहे कि, हा मराठीचा पहिला सिझन त्यानेच जिंकावा. आणि त्या दिशेने ते वाटचाल करताना देखील दिसत आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मेघा धाडेचे काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...