आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता मिलींद सोमणचा गर्लफ्रेंड अंकितासह साखरपुडा, डायमंड रिंग देऊन केले प्रपोज?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता-मॉडेल मिलींद सोमण गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. मिलींद त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान मुलीला डेट करत आहे. अंकिता कोवर असे मिलींदच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे आणि अंकिताने शेअर केलेल्या एका फोटोवरुन या कपलने साखरपुडा केल्याची सध्या चर्चा आहे. या फोटोमध्ये अंकिताने मिलींदचा हात धरलेला आहे आणि त्यात तिची डायमंड रिंग दिसत आहे. तीन वर्षातच दिला होता पहिल्या पत्नीला घटस्फोट..

 

मिलींद सोमणने जुलै 2006 साली फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. Mylene सोबत मिलींदची पहिली भेट गोवा येथे वॅली ऑफ फ्लॉवर्सच्या सेटवर झाली होती. 
- तीन वर्षात मिलींदने 2009 साली घटस्फोट घेतला.

 

मॉडल मधू सप्रेसोबत होते अफेअर..
एक्स मिस इंडिया मझू सप्रेसोबत मिलींदचे प्रेमसंबंध होते. दोघांनी एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान न्यूड पोज दिली होती. त्यानंतर या दोघांवर अश्लीलतेचा आरोप ठेवण्यात केस करण्यात आली होती.

 

बाजीराव मस्तानी चित्रपटात केले आहे काम..
मिलींदने बाजीराव मस्तानी चित्रपटात अंबाजी पंतचा रोल केला होता. मिलींद सध्या फिटनेस प्रमोटरचे काम करत आहे.

 

अलीशा चिनॉयसोबत केला होता डेब्यू..
- सुपरमॉडेल मिलिंद सोमणने 1995 मध्ये अलीशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' अल्डेबममधून डेब्यू केला होता. यानंतर त्याने 1998-99 मध्ये 'कॅप्टन व्योम' चित्रपटात काम केले होते. 
- मिलींद सोमणने 16 दिसंबर (2002), भेजा फ्राई (2007), भ्रम (2008), नक्षत्र (2010), डेविड (2013) आणि बाजीराव मस्तानी (2015) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

 

असा बनला आयरनमॅन..
- 19 जुलै, 2016 रोजी ज्यूरिखमध्ये मिलिंदने आयरनमॅन स्पर्धा जिंकली. त्याने तिथे 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर साइकिलिंग आणि 42.2 किलोमीटर रनिंग 15 तास 19 मिनटात पूर्ण केली होती. 
- मिलिंदने 10 वर्षाचा असतानाच स्विमींग करण्यास सुरुवात केली होती. 15 व्या वर्षी रनिंग करण्यास सुरुवात करणाऱ्या मिलिंदने 2004 साली हाफ मॅरेथॉन जिंकली होती. 
- मिलिंदचा जन्म स्कॉटलँड येथे झाला. त्याचे आजोबा डॉक्टर, वडील न्यूक्लिअर सायंटीस्ट आणि आई उषा बायो-केमिस्ट्रीमध्ये प्रोफेसर आहे. स्कॉटलँड आणि काही वर्षे इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर त्यांचे पूर्ण कुटुंब भारतात शिफ्ट झाले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलींद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिता कोंवरचे काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...