आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद सोमणने थाटले 25 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न, अशी होती एक्स-गर्लफ्रेंडची रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिता कंवर यांनी 22 एप्रिल रोजी अलिबाग येथे विवाह केला. हे लग्न महाराष्ट्रीयन आणि आसामी रितीरिवाजाने झाले. अंकिता वयाने मिलिंदपेक्षा जवळपास 25 वर्षाने लहान आहे आणि आता या दोघांच्या लग्नावर मिलिंदची एक्स गर्लफ्रेंड शहाना गोस्वामीने रिअॅक्शन दिली आहे. शहाना आणि मिलिंदची पहिली भेट 2010 साली झाली होती. मिलिंदच्या लग्नाबद्दल काय बोलली शहाना गोस्वामी...

 

मिलिंदच्या लग्नाबाबत जेव्हा शहानाला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले, मिलिंद आणि मी अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि मी मिलिंदच्या लग्नाबाबत फार खूश आहे आणि मला वाटते की अंकितासोबत तो सर्वात जास्त खुश राहील. दोघांची जोडी फार छान दिसते आणि मी त्या दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. 

 

कोण आहे शहाना गोस्वामी...
शहाना गोस्वामी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2010 साली मिलिंदशी भेट झाल्यानंतर ते दोघे विविध ठिकाणी एकत्र दिसत. मिलिंद आणि शहानाच्या वयातही 21 वर्षाचे अंतर होते. माइलिननंतर शहानासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे मिलिंदनेही कबुल केले होते पण चार वर्षे सोबत राहिल्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलिंद सोमण आणि शहाना गोस्वामीचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...