आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या नावाने एक झाड, मिलिंद-अंकिताचा अनोखा उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आयरनमॅन' मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिता कंवरचे लग्न 22 एप्रिल रोजी अलिबाग येथे पार पडले. फारसा गाजावाजा न करता साध्यासोप्या पद्धतीने हे दोघे विवाहबंधनात अडकले. यानंतर आज मिलिंद सोमणने एक फोटो अपलोड केला आहे आणि त्याच तो त्याची पत्नी अंकितासोबत झाड लावताना दिसत आहे. मिलिंदने यासोबत एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात त्याने लग्नात आलेल्या प्रत्येक एका पाहुण्याच्या नावाने एक झाड लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात त्याने 11 झाडे लावल्याचे सांगितले.

 

मिलिंदने लिहीले की, Nurture the gifts you have received 😊 planting a tree with @earthy_5 for every guest, 11 done! 

 

यासोबतच मिलिंदची पत्नी अंकिता कोंवारनेही तिच्या इन्सटाग्रामवर लग्नाची काही फोटो शेअर केली आहेत. लग्नानंतर काही दिवस अंकिता-मिलिंदचा अलिबाग येथे मुक्काम असल्याचे कळते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंकिता-मिलिंदने शेअर केलेले काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...