आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos:मेहंदी-हळदपासून ते लग्नापर्यत, असा होता \'आयरनमॅन\' मिलिंदच्या दुसऱ्या लग्नाचा थाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'आयरनमॅन' म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमण नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. काल रविवारी मिलिंदने त्याची प्रेयसी अंकिता कोवरसोबत साताजन्माची गाठ बांधली आहे. विशेष म्हणजे मिलिंदचे हे दुसरे तर अंकिताचे हे पहिले लग्न आहे, मिलिंदपेत्रा अंकिता वयाने 25 वर्षाने लहान आहे आणि त्याचमुळे यांच्या नात्यात फार चर्चा होत होत्या पण अखेर हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत.  

 

अलिबाग येथे होते डेस्टीनेशन वेडींग...
मिलिंदने लग्नासाठी अलिबाग येथील एका फार्महाऊसची निवड केली होती. मिळालेल्या माहितीनुसार हे फार्महाऊस मिलिंद आणि त्याच्या एका पार्टनरच्या मालकीचे असल्याचे कळते. फारसा मोठा गाजावाजा न करता हे लग्न छान पार पडले. हळदीच्या दिवशी संपूर्ण फार्महाऊस पिवळ्या फुलांनी सजलेले होते.

 

महाराष्ट्रीयन पद्धतीने थाटले लग्न..
आपणा सर्वांनाच माहीत आहे की मिलिंदचा जन्म मराठी कुटुंबात झाला आहे तर मिलिंदची पत्नी ही आसामी आहे त्यामुळे हे लग्न कोणत्या पद्धतीने लागणार याची सर्वाना उत्सुक्ता होती. पण हे लग्न मराठी पद्धतीत पार पडले. लग्नावेळी अंकिताने पांढरी साडी नऊवार घातली होती आणि मिलिंदने पांढरा कुर्ता आणि धोतर घातले होते. आसामी पद्धतीच्या लग्नात पांढरे वस्त्र घातले जातात त्यामुळे विधी जरी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या होत्या तरी लग्नाला एक आसामी टचही देण्यात आला होता. 

 

अलिबाग येथे 20 तारखेपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. हळद, संगीत आणि त्यानंतर लग्न अशा क्रमाने हे लग्न पार पडले. मिलींदच्या जवळच्या मित्रमैत्रीणींनी तसेच नातेवाईकांनी या लग्नाचा उपस्थिती लावली होती. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलिंदच्या मेहंदीपासूनचे ते लग्नाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...