आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिर्ची म्युझिक अवॉर्ड्स मराठीच्या सहाव्या पर्वाची घोषणा, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आहेत परिक्षक मंडळ प्रमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एफएम या भारतातील हॉटेस्ट रेडिओ स्टेशनने सहाव्या मराठी संगीत महासोहळ्याची घोषणा केली आहे. मराठी संगीतातील कलावंतांना रेड कार्पेटवर आमंत्रित करुन सर्व कलाकारंसाठी संगीत आणि पुरस्कारांनी भरगच्च अशा संध्येचे आयोजन या निमित्ताने केले जाते. मराठी संगीत क्षेत्रातील महान कलाकारांचा गौरव आणि सन्मान करणारे एक व्यासपीठ असलेले एमएमए मराठी आता आपल्या सहाव्या वर्षात आहे आणि लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरलेला आमि मान्यताप्राप्त झालेला सोहळा बनला आहे. त्याचे मुख्य कारण येथील मान्यवर परिक्षकांकडून केले जाणारे न्याय्य परिक्षण हे आहे. 

 

मिर्ची म्युझिक अवॉर्डस मराठीच्या घोषणेच्या आधी मराठी संगीत उद्योगातील दिग्गजांचा समावेश असलेले पॅनलिस्ट एकत्र आले आणि त्यांनी विविध वर्गवारीमध्ये 2017 च्या नामनिर्देशनाचा अभ्यास केला. एकत्र आलेल्या परिक्षक मंडळातील सदस्यांनी पुरस्कर नामनिर्देशनाचा अभ्यास केला आणि विजेत्यांची निवड केली. या परिक्षक मंडळाच्या अध्यक्षस्थानी सर्वांचे लाडके गायक सुरेश वाडकर आहेत आणि ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पुरस्कार विजेते संगीत निर्माते आशिष केसकर, नादखुळाते संगीतकार हर्षित अभिराज, प्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी, संगीतकार गायक निखील महामुनी. ताकदीच्या गायिका मृण्मयी फाटक, वैविध्यपूर्ण गाण्याचे श्रेय नावावर असलेल्या सिंथिया फुर्टाडो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अंजली मराठे, संगीत दिग्र्शक आणि गायिका धनश्री गणात्रा, गायिका सावनी रविंद्र, संगीत निर्देशकचैतन्य आडकर, अभिनेता अजय पुरकर, गायक आणि संगीतकार हृषिकेश कामेरकर, साऊंड इंजिनीअर अवधुत वाडकर, गायक संगीतकार विश्वजीत जोशी, पुरस्कार विजेते कवी मंदार गौंजकर, गायिका आणि निवेदक नेहा राजपाल आणि राहूल रानडे यांचा समावेश आहे. 

 

मिर्ची म्युझिक अवॉर्ड मराठीसोबत आपली भागीदारी आणि आठवणी सांगताना परिक्षक मंडळाचे प्रमुख सुरेश वाडकर म्हणाले की, मिर्ची म्युझिक अवॉर्ड्स हा मराठी संगीत क्षेत्रातील सर्वाधिक न्याय, प्रामाणिक आणि आनंददायी पुरस्कार सोहळा आहे. मी या सोहळ्यासोबत गेल्या पाच वर्षापासून जोडलो गेलो आहे आणि यंदाच्या सहाव्या वर्षी मला या पुरस्कारात फार आनंद होत आहे. या प्रकारच्या संगीत सोहळ्यामुळे संगीतकारांना मेहनत करण्याची आणि रचनांद्वारे जादू करण्याची प्रेरणा मिळते आणि आपण त्यात मंत्रमुग्ध होतो.  हा पुरस्कार सोहळा फार दिमाखदा होणार याची मला खात्री आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिर्ची म्युझिक अवॉर्डनिमित्त जमलेले सर्व परिक्षकांचे खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...