आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टरटेनमेंट डेस्क - नुकतेच मराठी इंडस्ट्रीतील एक रोमँटीक कपल समोर आले आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी व्हॅलेंटाईन डेला एकमेकांसोबत त्यांचे रिलेशनशीप असल्याचे सर्वांसमोर सांगितले आहे. सिद्धार्थ चांदेकर येत्या 16 फेब्रुवारी रोजी 'गुलाबजाम' या चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहे पण मिताली 'फ्रेशर्स' या मालिकेनंतर फारशी प्रकाशझोतात आली नाही. तिने आतापर्यंत 'असंभव', 'भाग्यलक्ष्मी', 'उंच माझा झोका' आणि 'तु माझा सांगती' या मराठी मालिकांत काम केले आहे.
मितालीने 'उर्फी' या चित्रपटातून अमृताची केलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. सध्या इंडस्ट्रीत नसली तरी मिताली सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे आणि तिचे फोटोज् नेहमी फॅन्ससाठी शेअर करत असते. आज तिचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत..
सिगारेट ओढताना केले फोटोशूट..
मितालीचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिले असता त्यावर अनेक ग्लॅमरस फोटोज् आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकी तिचे काही ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोशूट आपले खास लक्ष वेधून घेतात. मितालीने सिगारेट ओढून तसेच शॉर्ट ड्रेसेसमधील फोटोशूटही खास पाहण्यासारखे आहे.
सिद्धार्थ आहे बालपणीचा क्रश..
मितालीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फोटो शेअर केला होता त्यावर तिने कॅप्शन दिले होते की बालपणीचा क्रश ते खोडकर मित्र, वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावरुन सिद्धार्थ हा तिचा लहानपणीचा क्रश होता असे कळते. आता हे दोधे रिलेशनशीपमध्ये आहेत तर यावर दोघांची थेट प्रतिक्रिया कशी येते हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, मिताली मयेकरचे इंस्टाग्रामचे काही खास Photos...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.