आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थला गर्लफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केले B\'day विश, हिच्यासाठी सोडले होते \'शनाया\'ला!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 27 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने सिद्धार्थची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मिताली मयेकर हिने अतिशय रोमँटिक अंदाजात सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ितालीने इंस्टाग्रामवर दोघांचा एक खास फोटो शेअर करुन लिहिले, "Happy happy birthday to the guy I love more than Mississippi Mud Ice Cream!❤️ I'm so glad that you were born. Thank you for being Jack to Rebecca. (You know the reference now, all the shitty gifts.) So yeah.🤭 Prem and all that.😘💕 #Po #birthdayboy #stillakid"

 

यावर्षी व्हॅलेंटाइन डेला दिली प्रेमाची कबुली... 

काही महिन्यांपासून सिद्धार्थ आणि मिताली यांच्यात मैत्रीपलीकडील नाते निर्माण झाल्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेर मितालीने यावर्षी व्हॅलेंटाइन डेला सिद्धार्थवरच्या प्रेमाची कबुली देत त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. मितालीने 'yes yes Yes' असे कॅप्शन देत दोघांचा एक फोटो शेअर केला होता. 

 

सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचं नातं चांगलंच बहरत आहे. दोघांनी मनगटावर एकत्र टॅटूही काढले आहेत आणि तेही अगदी सेम टू सेम. मितालीसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत असून तिला आपण 'उर्फी' या चित्रपटात पाहिले आहे. याशिवाय झी युवाच्या 'फ्रेशर्स' मालिकेतही ती चमकली होती.

 

रसिका सुनीलसोबत अफेअर असल्याची होती चर्चा...
मितालीपुर्वी सिद्धार्थ अभिनेत्री रसिका सुनीलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. माझ्या नव-याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका वठवणा-या रसिका सुनीलसोबत सिद्धार्थ अनेक ठिकाणी दिसायचा.दोघे कॉफी डेट, मुव्ही डेटवर जातानाचे अनेक फोटोज दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. पण काही दिवसांत हे दोघे सोबत दिसेनासे झाले. त्यानंतर काही दिवसांतच सिद्धार्थ आणि मिताली यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. 


पाहुयात, सिद्धार्थ आणि मिताली यांचे रोमँटिक फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...