आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी प्रेक्षकांची लाडकी 'जुई'ला सासरी जाऊन झाले 2 वर्ष, अमेरिकेत इंजिनीअर तरुणासोबत थाटलाय संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बालाजी टेलिफिल्मसची मराठी मालिका‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृणाल दुसानीस आज तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. मुळची नाशिकची असलेली मृणालने 25 फेब्रुवारी 2016 रोजी अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या नीरज मोरे या तरुणासोबत संसार थाटला आहे. नाशिकमध्येच हा विवाह पार पडला होता. मृणालने तिच्या साध्या-सरळ रुपाने प्रेक्षकांवर चांगलीच मोहिनी घातली होती. आता सध्या मृणाल अमेरिकेत असल्याने तिने मालिकांत काम करण्याचे थांबवले आहे. मृणालने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, अस्स सासर सुरेख बाई यांसारख्या मालिकांत काम केले आहे. 


मृणाल-नीरजचे झाले आहे अरेंज मॅरेज.. 

अभिनेत्री असूनही मृणालने तिच्या लग्नाची जबाबदारी तिच्या कुटुंबियांवर सोपविली होती. नीरज-मृणालचा अगदी पारंपारीक पद्धतीने साखरपुडा पुण्यात पार पडला होता. या कार्यक्रमानंतर नीरज अमेरिकेत निघून गेला. ते दोघे एकमेकांशी नीट बोललेही नव्हते. पण नंतर योगायोगाने मृणाल महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेली आणि तिथे ते दोघे भेटले. औपचारिक बोलणे झाल्यानंतर त्या दोघांचा विवाह थाटामाटात पार पडला होता. लग्नासाठी पाहायला आलेला नीरज हा तिसरा मुलगा असल्याचेही मृणालने एका मुलाखतीत सांगितले.


अमेरिकेत असा फुलवतेय संसार...
मृणालचा पती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तो सध्या अमेरिका येथे राहतो. मालिका सोडल्यानंतर मृणाल लागलीच अमेरिकेत गेली. तिथे गेल्यापासून अमेरिका एक्सप्लोर करत असल्याचे मृणालने सांगितले. पती नीरजसोबत फिरणे, त्याला वेगवेगळ्या डिशेस करुन खाऊ घालणे, घराची सजावट, किराणा यादी तयार करणे असे सर्व काम करत असल्याचे तिने सांगितले. मृणालला स्नोफॉल खूप आवडतो आणि आयुष्यात एकदातरी स्नोफॉल एन्जॉय करत असल्याची इच्छा असल्याने अमेरिका खूप खास वाटते असे तिने सांगितले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मृणाल-नीरजच्या लग्नाचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...