आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Women\'s day spcl:\'आई\' माझ्या यशाची सोबतीण सांगतेय, प्रेक्षकांची लाडकी मृणाल दुसानीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फक्त यशस्वी पुरुषाच्याचं नाही तर यशस्वी स्त्री च्या मागे देखील एका स्त्रीचाच हात असतो  आणि हाच पाठींबा यशाच्या प्रत्येक पायरीवर महत्वाचा असतो. नाशिक सारख्या  शहरात दृश्य माध्यमातील जाहिरातींतून सुरु केलेला मृणाल दुसानीस या नावाजलेल्या नाशिककर अभिनेत्रीच्या यशाच्या प्रवासात तिची 'आई' हा एक अविभाज्य घटक आहे. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकतांना आईचा तसेच घरातल्या सगळ्यांचाच तिला विरोध होता परंतु आपले विचार, इच्छा आणि स्वप्नं मृणालने स्पष्ट आणि निर्भीडपणे मांडले. तिच्या इच्छा शक्तीला त्यानंतर घरातून सगळ्यांचेच पाठबळ मिळाले. योग्य वेळी स्पष्ट संवाद साधून तीने एक अभिनेत्री म्हणून प्रवास सुरु केला. काही वर्षातच मृणाल दुसानीस हे मराठी प्रेक्षकांचे  आवडते नाव ठरले व मृणाल  एक यशस्वी  अभिनेत्री म्ह्णून नावारूपाला आली आहे. मृणाल सहा महिने अमेरिकेत राहून नुकतीच भारतात परतलीये.  जागतिक महिला दिनानिमित्य दिव्य मराठी वेबने मृणालशी खास संवाद साधला.

 

प्रश्न: सहा महिने अमेरिकेत राहून तू पुन्हा भारतात परतली आहेस, हा ब्रेक कसा वाटला?
मृणाल : मी हा ब्रेक खूप एन्जॉय केला. माझा नवरा नीरज अमेरिकेत स्थायिक आहे. माझ्या  कामामुळे  आम्हाला एकत्र असा फार कमी वेळ मिळतो आणि म्ह्णूनच नवऱ्याबरोबर  निवांत वेळ घालवण्यासाठी मी अमेरिकेत गेले होते. कुटुंबासोबत आणखी काही काळ राहण्याचा मोह मला नक्कीच होत होता परंतु माझ्या कामाच्या ओढीने मला पुन्हा भारतात आणलंय आणि काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत मी सध्या आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा मृणालने सांगितले, कसे होते मृणालच्या करिअरचे सुरुवातीचे दिवस...

बातम्या आणखी आहेत...