आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीच बोल्ड रुपात दिसली नाही मृणाल दुसानीस, पतीला पडला होता प्रश्न \'फक्त पंजाबी ड्रेसच घालते का\'?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीला एक सोज्वळ, सुंदर चेहरा भेटला तो म्हणजे मृणाल दुसानीस. आपल्या साध्या-सरळ स्वभावाने आणि सालस सौंदर्याने मृणालने सर्वांना तिची भूरळ पाडली. आज मृणाल तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. 25 फेब्रुवारी 2016 रोजी विवाहबंधनात अडकलेली मृणाल फक्त चेहऱ्यानेच नव्हे तर स्वभावानेही तितकीच साधी आहे. कधीही कुठल्याच कॉँट्र्वर्सीत न अडकलेली मृणाल टीपीकल अरेंज मॅरेज पद्धतीने लग्नगाठीत अडकली आणि अमेरिकेत पतीसोबत संसार थाटला. पतीला वाटले फक्त पंजाबी ड्रेसच घालते मृणाल...

 

मृणाल दुसानीसचा पती नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे आणि त्याचा अमेरिकेत जॉब आहे. कांदेपोहेच्या कार्यक्रमादरम्यान मृणाल-नीरज प्रथम एकमेकांशी बोलले. मृणाल अभिनेत्री आहे हे त्याच्या आईवडिलांनी त्याला अगोदर सांगितले होते त्यामुळे त्याने गुगलवर तिचे काही फोटो सर्च केले होते. अभिनेत्री असूनही तिचा एकही मॉर्डन लुकचा फोटो त्याला मिळाला नाही त्यामुळे त्याने पहिल्या भेटीत तिला तुम्ही फक्त पंजाबी ड्रेसच घालता का इतकाच प्रश्न विचारला. 

 

खरोखरच अभिनेत्री असूनही मृणालने तिचा साधेपणा जपला आहे. तिला आतापर्यंत एकदाही बोल्ड रुपात प्रेक्षकांनी पाहिलेले आहे. अगदी वैयक्तिक आयुष्यातही मृणालने कधीची मॉर्डन वेशभुषा केलेली नाही. तिने जपलेला हा साधेपणा प्रेक्षकांना आपलेसे करुन जातो. 

 

मृणालने आतापर्यंत 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तु तिथे मी' आणि 'अस्स सासर सुरेख बाई' यांसारख्या मालिकांत काम केले आहे. मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे, तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या कार्यक्रमाद्वारे तिच्या नृत्यकलेचा नजराणाही प्रेक्षकांसाठी आणला. मृणालने तिन्ही मालिकांत केलेल्या तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. मृणालने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ शेअर करत ती लवकरच भारतात परतणार असल्याचे सांगितले होते. आता नुकताच तिने फोटो पोस्ट केला आहे आणि ती भारतात परतल्याची माहिती दिली आहे. आता भारतात परतल्यानंतर ती कोणता नवीन प्रोजेक्ट हाती घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मृणाल दुसानीसचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...