आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मराठमोळी अभिनेत्री बनली हृतिक रोशनची \'पत्नी\', \'सुपर 30\'मध्ये दिसला या ग्लॅमकन्येचा साधा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारलेला चित्रपट सुपर30मध्ये हृतिकसोबत एका मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. तिचे नाव आहे मृणाल ठाकूर. या चित्रपटात मृणालला हृतिकच्या पत्नीची भूमिका मिळाली आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून चित्रपटाचे काही ऑन लोकेशन फोटोही समोर आले आहेत. 

 

मृणाल ठाकूर आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. पाटणा, वाराणसी आणि मुंबईत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांचे जीवन हृतिक रोशन मोठ्या पडद्यावर रेखाटणार आहे. मृणालचा हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट आहे. 

 

मराठी चित्रपटात केले आहे काम..
मृणाल ठाकूरने  ‘विटी दांडू’, ‘हॅलो नंदन’, ‘सुराज्य’ यांसारख्या मराठी चित्रपटातही काम केले आहे तसेच अनेक हिंदी मालिकांमधून मृणालचा चेहरा प्रेक्षकांसाठी ओळखीची आहे. सुपर 30 या चित्रपटात साध्या रुपात प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेत्री मृणाल ठाकूरचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...