आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आम्ही दोघी'मधील भूमिकेसाठी अभिनेत्री मुक्ता बर्वे शिकली हे खास काम !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांचा 'आम्ही दोघी' हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील मुक्ताचा गावरान तर प्रियाचा मॉर्डन लुक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे मुक्ताने तिच्या गावरान अंदाजासाठी केवळ लुकवरच नव्हे तर स्किल्सवरही मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी मुक्ता बर्वेने शिवणकाम शिकले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मुक्ता शिवणकाम करताना दिसत आहे. अभिनय करताना शिवणकामही परफेक्ट वाटावे, यासाठी मुक्ताने मेहनत घेतली आहे.

 

'आम्ही दोघी' मालिकेत मुक्ता बर्वेने अमला तर प्रिया बापटने सावित्री सरदेसाईची भूमिका केली आहे. चित्रपटात आजच्या तरुणींच्या नातेसंबंधाची गोष्ट सांगितली आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी या सर्वच नात्यांना स्पर्श केला आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेत्री मुक्ता बर्वेचा 'आम्ही दोघी' चित्रपटातील लुक....

बातम्या आणखी आहेत...