आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मुक्ताच्या जीवनातील #आम्हीदोघी, बेस्टफ्रेंड आजी ते दिवंगत अभिनेत्री 'रस्की'च्या आठवणींनी गहिवरली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  अभिनेत्री मुक्ता बर्वे आगामी सिनेमा 'आम्ही दोघी'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात मुक्तासोबत मराठी रसिकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आहे. चित्रपटात या दोघींनी एकमेकींच्या अगदी विरुद्धप्रकारची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे सध्या सर्वत्र प्रमोशन सुरु आहे. मुक्ताने या चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा एक वेगळा फंडा शोधला आह. मुक्ताने तिच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या स्त्रियांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. #amhidoghi लिहत मुक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. 

 

मुक्ताने तिची पहिली बेस्ट फ्रेंड म्हणजेच तिच्या आजीसोबतचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. तो फोटो शेअर करताना तिने लिहीले की, “आम्ही दोघी”च्या निमित्तानी मला एक वेगळाच छंद लागलाय, माझ्या खर्‍या आयुष्यात वेगवेगळ्या ट्प्प्यांवर एकमेकींना भेटलेल्या स्पेशल “आम्ही दोघी” चे फोटो शोधायचा :) माझी पहीली बेस्ट फ्रेंड , माझी आजी #amhidoghi #grandmother #aaji #grandmothergrandaughter #beyondmukta #beyondmuktabarve


मुक्ताने यानंतर दिवंगत अभिनेत्री रसिका जोशीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहीले की,  "रस्की , जिथे असशिल तिथे तुझ्या , मिश्कील ,energetic , enthusiastic style नी मौज करत असशिल याची खात्री आहे. Miss you 😘 #amhidoghi" 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मुक्ताने #आम्ही दोघी म्हणत शेअर केलेले Photos...

बातम्या आणखी आहेत...