आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BBDay37:मर्डर मिस्ट्री टास्कमध्ये खूनी बनला आस्ताद, घरातील 'या' सदस्याचा केला पहिला खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - बिग बॉस मराठीच्या घरात काल मर्डर मिस्ट्री हे टास्क पार पडले. यावेळी बिग बॉसने कन्फेशन रुममध्ये प्रत्येक सदस्यांना एका बॉक्समधील मोती निवडायचे होते आणि  या बॉक्समधील मोतींच्या रंगावरुन कोण गुप्तहेर, खूनी आणि कोण सामान्य नागरीक असणार ते कळणार होते. यातील खूनीला त्याची ओळख लपवायची होती. यावेळी गुप्तहेरांना खूनीला शोधायचे आहे. यात निळा मोती मिळाल्याने सुशांत आणि स्मिता गुप्तहेर बनले आहेत तर लाल मोती मिळाल्याने आस्ताद खूनी बनला आहे. तर सई, उषा, रेशम आणि घरातील इतर सदस्य सामान्य नागरीक बनले आहेत. 

 

खूनी आस्तादला कुणालातरी जेवण भरविणे, कुणाला तरी रडवणे, स्मिताला पुरुष कंटेस्टंटच्या गालावर किस करण्यास भाग पाडणे, कोणाचातरी फॅमिली फोटो लपवणे. खारट जेवण खाऊ घालणे असे टास्क करुन सांकेतिक गोष्टींनी खून करायचे होते. 
 
यात पहिला खून पुष्करचा झाला आहे कारण आस्तादने पुष्करचा फॅमिली फोटो लपविला आहे. यामुळे आता पुष्करला घराबाहेर जीम एरीयामधील गादीवरच बसून राहायचे आहे आणि त्याला केवळ उकलडेले पदार्थच खाण्यासाठी मिळणार आहेत. 

 

आज या मर्डर मिस्ट्रीच्या टास्कचा दुसरा दिवस रंगणार आहे आणि त्यात आस्ताद कोणाकोणाचा खून करण्यास यशस्वी होतो हे पाहायला मिळणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मर्डर मिस्ट्री टास्कदरम्यान घरातील सदस्यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...