आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीत नापास झाले होते 'सैराट फेम' नागराज मंजुळे, तुम्ही पाहिलीत का त्यांची मार्कशीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दहावीचा निकाल लागला. काही विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा तर काहींसाठी हा दिवस तसा दुःखद ठरला. काही विद्यार्थांना अपयश आल्यामुळे ते निराश झाले असणारच. पण अशा विद्यार्थ्यांसाठी मराठीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खास संदेश दिला आहे. त्यांनी मुलांना संदेश दिला की, "गुण म्हणजे गुणवत्ता नाही, तुमच्यात स्किल असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, परीक्षेत अपयश आले तरी खचून जाऊ नका, एखादी परीक्षा तुमच्या संपूर्ण आयुष्याचे भवितव्य घडवू शकत नाही."

 

केवळ एका परिक्षा तुमचे भवितव्य खराब करु शकत नाही असे सांगणारे नागराज खुद्द याचे अनुभवी आहेत. फारच कमी जणांना माहीत आहे की नागराज मंजुळे हे स्वतः दहावीच्या परिक्षेत नापास झाले होते. खोटे वाटले ना? याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास त्यांची गुणपत्रिका घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा नागराज मंजुळे यांची दहावीची गुणपत्रिका...

बातम्या आणखी आहेत...