आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नामदेव ढसाळ स्मृती पुरस्कार प्रदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना छसाळ स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. दिग्दर्शनासोबतच अभिनयातही नागराज मंजुळे यांचा हातखंडा आहे. सैराट, फँड्री, बंदुक्या यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या नागराज यांची मराठी चित्रपटक्षेत्रातील लोकप्रियता खूप आहे. हे सर्व विचारात घेऊन त्यांना नामदेव ढसाळ स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे. या कार्यक्रमाद्वारे नामदेव ढसाळ यांच्या स्मृती जपण्यात आल्या. 

 

यावेळी नागराज यांनी एका मुलाखतीत त्यांना देण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भविश्यात अनेक दर्जेदार चित्रपट बनवणार असल्याची ग्वाहीसुद्धा दिली. 

 

भीमा कोरेगावसारख्या घटनांनी दुःखी होतो..

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मुलाखतीत सांगितले, भीमा कोरेगाव यांसारख्या घटना आजही घडतात याचे वाईट वाटते. जातपात लक्षात घेऊन दंगली उसळतात हे कुठेतरी थांबायला पाहिजे असे प्रसादने सांगितले. 

 

यासोबतच अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा आगामी चित्रपटाची माहिती विचारली असता त्यांनी अजून या प्रोजेक्टला अवकाश असून योग्य वेळी योग्य माहिती पुरवण्यात येईल, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले.