आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'झुंड' गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचे कारण म्हणजे नागराज यांनी या चित्रपटाचा सेट सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणावर उभारला आहे. हा सेट आठ दिवसात काढण्याचे आदेश आता मंजुळे यांना देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या प्रांगणाचा वापर कोणत्याही खासगी कामांसाठी केला जाऊ शकत नाही अशा आशयाचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी विद्यापीठाला भेट दिली होती. या भेटीत नागराज मंजुळे यांना चित्रीकरणाच्या सेटसाठी परवानगी देण्यापूर्वी विद्यापीठाने जिल्हा प्रशासन अथवा उच्च तंत्रशिक्षण विभागाची परवानगी घेतली होती का, अशी विचारणा करत कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश वायकर यांनी दिले होते. या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठाने अग्निशामक दल किंवा अन्य कोणत्याही घटकांची परवानगी घेतली नाही याबद्दलची नाराजीही वायकर यांनी व्यक्त केली होती.
डॉ. करमळकर यांनी या घटनेची जबाबदारी घेत पुरेशा परवानग्या न घेता विद्यापीठाची जागा मंजुळे यांना वापरासाठी देण्यात आल्याचे स्पष्ट केले. 'झुंड' हा सिनेमा फुटबॉल या क्रिडा विषयावर असल्याने सहानुभुतीपुर्वक विचार करुन देण्यात आले पण यापुढे अशाप्रकारची चूक होणार नाही असे सांगत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. या पुढे असा कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास संबंधितांकडून परवानग्या घ्याव्यात, असेही वायकर यांनी सांगितले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.