आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, अशी जगतात आलिशान लाईफस्टाईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा 13वा वाढदिवस साजरा केला. 10 फेब्रुवारी 2005 साली महेशबाबू आणि नम्रता यांनी लग्नगाठ बांधली होती. नम्रताने सोशल मीडियावर एक क्युट फोटो शेअर करत पती महेशबाबूला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या लग्नाच्या 13व्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही नम्रता-महेशच्या लाईफस्टाईलबाबत खास माहिती घेऊन आलो आहोत. 

 

महेशबाबूने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत विवाह केला आहे. नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. 1993 साली मिस इंडिया बनल्यानंतर नम्रता चर्चेत आली होती. 22 जानेवारी 1972 साली जन्मलेली नम्रता आता तिच्या फॅमिली लाईफमध्ये व्यस्त आहे. साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत तिने लग्न केले आहे. आता तिला दोन मुले आहेत सितारा आणि गौतम. लग्नानंतर पतीसोबत नम्रता हैदराबाद येथे आलिशान आयुष्य जगत आहे.इतकी आहे नम्रताच्या पतीची संपत्ती...

 

नम्रताचा पती आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू 127 कोटींचा मालक आहे. वयाच्या 4थ्या वर्षी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून महेशबाबून काम करण्यास सुरुवात केले होते. नम्रता हैदराबाद येथे 11 कोटीच्या लक्झरी मॅन्शनमध्ये राहते. त्यातड्रॉइंग रूम, डाइनिंग रूम, स्टडी रूम, पूजा घर, मुलांसाठी प्ले रूम आहे. सुरक्षेचा विचार करता बंगल्याच्या वॉल कंपाउंडची उंची फार जास्त आहे. याशिवाय ज्युबिली हिल्सवरही एक मोठा बंगला आहे.

नम्रताकडे लक्झरी गाड्यांचा ताफा आहे त्यात Lamborghini Gallardo (3 कोटी), Range Rover Vogue (1.6 कोटी रुपये), Toyota Land Cruiser (1.6 कोटी), Mercedes Benz E class(49 लाख )Audi A 8 (1.30 कोटी) असे गाड्यांचे कलेक्शन आहे. महेश बाबू एका चित्रपटासाठी जवळपास 18 ते 20 कोटी रुपये घेतो.

 

नम्रता शिरोडकरची बहीण शिल्पा शिरोडकरही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिल्पा सध्या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यात व्यस्त आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नम्रता-महेशबाबू यांच्या घराचे आणि फॅमिलीचे काही खास PHOTOs....

बातम्या आणखी आहेत...