आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 67 व्या वर्षातही फिट अॅण्ड फाईन आहेत नाना पाटेकर, हा आहे त्यांचा फिटनेस मंत्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 एन्टरटेनमेंट डेस्क - मराठी तसेच हिंदी चित्रपटांतही अभिनयाचा डंका वाजवणारे अभिनेता नाना पाटेकर यांचा सिनेमा आपला माणूस आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात नाना यांनी एका पोलीस ऑफिसरची भूमिका केली आहे जे एका डेथ मिस्ट्रीचा तपास करत आहेत. नेहमीप्रमाणेच नानांची या चित्रपटातील भूमिका त्यांनी उत्तमपणे साकारली आहे. विशेष म्हणजे नाना यांचा या चित्रपटात डॅशिंग अंदाज दिसत आहे. अजूनही दिसतात फार फिट अॅण्ड फाईन..
 
 नाना पाटेकर हे इंडस्ट्रीतील एक फिट अभिनेते म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटात सक्रिय असणारे नाना आपल्याला कधीच जाडेजूड झालेले दिसले नाही. नाना आरोग्याबाबत फारच जागरुक आहेत आणि फिटनेस हाच त्यांचे इंडस्ट्रीतील यश आहे असे सांगण्यासही ते विसरत नाहीत.  
 
 कितीही जीने चढून जाण्याची असते तयारी..
 नाना फिटनेसला फार महत्तव देतात याचे उदाहरण द्यायचे म्हटले तर नाना एका चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि त्यावेळी ते ज्या बिल्डींगमध्ये शूटिंग करत होते त्याची लिफ्ट खराब झाली. विशेष म्हणजे बिल्डींगच्या 15व्या मजल्यावर शूटिंग सुरु होते. लिफ्ट खराब झाली म्हणून सेटवरील सर्वचजण कुरबुर करु लागले पण नाना जोपर्यंत लिफ्ट सुरु होत नाही तितके दिवस विनातक्रार 15 मजले चढत-उतरत असत. 

 

खाण्याचे आहे शौकीन..
नाना व्यायामासोबतच खाण्यापिण्याकडेही फार लक्ष देतात. नाना पाटेकर कधीही गोड खात नाहीत. लहानपणी फार गरीबीत असल्याने त्यांना कधीच गोड खायला मिळाले नाही पण आता त्यांना ते बरेच झाले असे म्हणतात. गोड खायला नको आणि वजनही वाढायला नको असे म्हणतात. नानांनी 1978 सालापासून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत नाना कधीही लठ्ठ झाले नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, नाना पाटेकर यांचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...