आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Photos:लहानपणी इतकी भीषण गरीबी की कधीच गोड खाल्ले नाही, नानांनी जागविल्या जुन्या आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'आपला मानूस' या चित्रपटाद्वारे मराठी प्रेक्षकांच्या भेटीला नाना पाटेकर येणार आहेत. तसे पाहायचे तर नाना यांच्यासोबत काम करणे प्रत्येक मराठी कलाकारांचे स्वप्न असते कारण नानांमध्ये प्रत्येकाला आपला मानूस गवसतो. नाना एक कलाकार म्हणून किती उत्कृष्ट आहेत हे वेगळे सांगायला नको पण एक माणून म्हणूनही हळवे आणि गोरगरीबांच्या मदतीला धावणाने नाना यांना पाहिले की यशाची गगनभरारी घेतलेले नाना किती नम्र आहेत हे कळते. नाना सध्या 'आपला मानूस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेले आहेत. त्यानिमित्त 'आज काय स्पेशल' या कार्यक्रमात गेल्यावर त्यांनी बालपण तसेच त्यांच्या खवय्येगिरीची सर्व माहिती दिली.

 

लहानपणी अतिशय गरीबी असल्याने कधीच गोड खाल्ले नाही...

नाना पाटेकर यांना तिखट खाणे फार आवडते याचे कारण त्यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या जीवनाचा एक वेगळाच पैलु उलगडून दाखवला. त्यांनी सांगितले की त्यांचे बालपण अतिशय हलाखीत गेले. यामुळे जेव्हा त्यांच्यासोबतची मुले चॉकलेट खात असत तेव्हा नाना दुःखाचा आवंढा गिळत असत. गोड खाणे काय असते हे त्यांना लहानपणी कधीच कळाले नाही आणि त्यामुळे जर ते आपल्याला मिळत नसेल तर ते मुळात चांगलेच नाही असे त्यांनी स्वतःच्या मनाला समजवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांच्या मनात गोडाविषयी नावड निर्माण झाली. ती नावड आजपर्यंतही कायम आहे आणि आता मिळत असले तरी गोड तब्येतीलाही बरे नाही असे म्हणत ते गोड खाणे टाळतात. 

 

तिखट खाल्ले की लवकर भरते पोट...
माणसाने तिखट खाल्ले की त्याचे पोट लवकर भरते त्यामुळे लहानपणी त्यांना अतिशय तिखट जेवण मिळत असे आणि त्यामुळे तिखटावर जास्त पाणी पिऊन ते पोट भरले या जाणीवेने झोपत असत. त्यामुळे लहानपणापासून ते आतापर्यंत त्यांना तिखट खायला फार आवडते आणि तीच त्यांची सवय आहे.

 

नववीत असताना लागले नोकरीला..
घरातील गरीबीमुळे नाना यांनी फार कमी वयात नोकरीला सुरुवात केली होती. केवळ नववीत असताना त्यांना कमवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना 35 रुपये महिना असा पगार मिळत असे. या नोकरीत त्यांना एकवेळ जेवणही मिळत असे.

 

स्वयंपाकाची आहे आवड..
नाना यांना स्वयंपाकाची फार आवड आहे. चित्रपटाच्या सेटवर 150-200 लोकांचे जेवण ते आरामात बनवतात. नाना तसे बोलायला फटकळ आहेत त्यामुळे सेटवर अनेकदा त्यांचे लोकांसोबत भांडण होते. सेटवर कुकींग केल्यानंतर हे काही राग-रोष आपोआप बाहेर पडतात आणि पुढचे काही दिवस शूटिंगसाठी सोपे बनतात. नाना हसत म्हणतात, मला जेवण आणि शिव्या लोकांना खाऊ घालण्याची फार आवड आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नाना पाटेकर यांचे काही खास Rare Photos....

बातम्या आणखी आहेत...