आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीच्या कडुगोड आठवणी सांगणारा 'नवरा असावा तर असा' कार्यक्रमाचे ५० भाग पूर्ण !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नवऱ्यासाठी त्याची बायको ही त्याला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील अतिशय प्रिय व्यक्ती असते. आता याच प्रिय व्यक्तीचं म्हणजेचं बायकोचं मनं जिंकण्यासाठी कलर्स मराठी त्यांच्या 'नवऱ्यासाठी' एक अनोखं आव्हान घेऊन आले. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा खानविलकर करत आहेत. नुकताच सुरु झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदा ताईशी मनमोकळे पणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. प्रेक्षकांनी दिलेल्या पसंती आणि प्रेमानेमुळेच “नवरा असावा तर असा” या कार्यक्रमाने नुकतेच ५० भाग पूर्ण केले आहेत.

 

या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना महाराष्ट्रासमोर त्यांच्या बायकोला आवडणारी एखादी खास गोष्ट करण्याची संधी मिळाली जे पाहून त्यांच्या गृहलक्ष्मी नक्कीच त्यांच्यावर खुश तर नक्कीच होत असतील. कार्यक्रमामध्ये बायको नवऱ्यासाठी आव्हान ठरवते आणि नवरा हे आव्हान पूर्ण करतो आणि जो पूर्ण करतो तोच त्या भागाचा विजेता ठरतो. यामध्ये गंमत अशी आहे कि, जिंकतो नवरा आणि बक्षीस मिळते बायकोला. या आगळ्यावेगळ्याने संकल्पनेमुळे हा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहे. ईतकेच नव्हे तर हर्षदाताई यांची वेशभूषा, त्यांच्या साड्या, त्यांची “नवरा असावा तर असा” हे बोलण्याची पद्धत देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

बातम्या आणखी आहेत...