आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'मन उधाण वाऱ्याचे' आणि 'अजूनही चांदरात आहे' या मालिकेतून आपल्या अभिनयाने आणि निरागस सुंदरतेने सर्वांना मंत्रमुग्ध करणाकी अभिनेत्री नेहा गद्रे आता पुन्हा एकदा आपल्यासमोर येण्यास सज्ज झाली आहे. जवळपास 4 वर्षाचा ब्रेक घेतल्यानंतर नेहा आता 'गडबड झाली' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजेश श्रृंगारपुरे मुख्य भूमिकेत आहे.
नेहाने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करत तिचा या नवीन चित्रपटातील लुक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यानिमित्त divyamarathi.com सोबत तिने संवाद साधला आणि तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल आणि इंडस्ट्रीतील तिच्या 3-4 वर्षाच्या गॅपबद्दल माहिती दिली.
Q.तु 'एकापेक्षा एक अप्सरा आली' (2013) नंतर जवळपास 3-4 वर्षाचा गॅप घेतलास?त्यादरम्यान काय करत होतीस?
A. या काळात मी माझे जर्मन भाषेतील मास्टर्स डिग्री पूर्ण केली. या डिग्रीच्या तयारीसाठी काही काळ आणि त्यानंतर 2 वर्षे डिग्रीचे असे हे वर्ष मी पूर्णपणे अभ्यासात घालवले. डिग्री पूर्ण झाल्यानंतर काही काळ मी ट्रांसलेटरचे कामही पाहिले. अभिनयाअगोदर शिक्षण हे माझे पहिले ध्येय होते आणि इंडस्ट्रीत पुनरागमन करण्याची योग्य वेळ आहे, असे वाटल्यानंतर 'गडबड झाली' हा चित्रपट साईन केला.
Q.आगामी चित्रपटाबद्दल माहिती सांगशील?
A. 'गडबड झाली' हा चित्रपट प्रांजली प्रोडक्शन बॅरनखाली बनत आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून त्यात उषा नाडकर्णी, मोहन जोशी, राजेश श्रृंगारपुरे, विकास पाटील या कलाकारांसोबत मी काम करत आहे. अर्धे शूटिंग पूर्ण झाले असून आता एका गाण्याचे शूटिंग कुलु-मनाली येथे होणार आहे. मेमध्ये हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेत्री नेहा गद्रेचे On location Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.