आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला आठवतेय \'मन उधाण वाऱ्याचे\'मधील ही गोड अभिनेत्री, आता नववधू रुपातील फोटो आला समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काही वर्षांपूर्वी 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतील गौरी अर्थात अभिनेत्री नेहा गद्रे गेली 4-5 वर्षे इंडस्ट्रीपासून लांब आहे. इंडस्ट्रीपासून लांब असली तरी नेहा सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे. नेहाने मन उधाण वाऱ्याचेमधीव साकारलेली गौरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. तेव्हा प्रत्येक तरुणाला आपली होणारी पत्नी गौरीसारखीच असावी असे वाटत असे. तसे पाहिले तर गौरी प्रत्यक्ष जीवनात फार ग्लॅमरस आहे हे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आपल्याला कळते. 

 

नेहाने 'मोकळा श्वास' (2012) हा चित्रपट आणि 'अजूनही चांदरात आहे' या मालिकेतील रेवाची तिची भूमिका खूप गाजली. यानंतर नेहा कोणत्याही मराठी मालिकेत अथवा चित्रपटात दिसली नाही. नेहाने तिच्या अनेक मुलाखतीत तिला जर्मन भाषा शिकण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. नेहाने 'एकापेक्षा एक अप्सरा आली'मध्ये तिच्या नृत्याचा जलवाही दाखविला होता. नेहा गद्रे अभिनेता अभिनय बेर्डे आणि  त्याची बहिणी स्वानंदी बेर्डेची खास मैत्रीण आहे.

 

नेहाने अनेक दिवसानंतर तिचा नववधूच्या रुपातील फोटो शेअर केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये तिने नवीन शूटिंगसीन म्हटले आहे. पण हा नेमका कोणता प्रोजेक्ट आहे त्याबद्दल माहिती सांगितलेली नाही. लवकरच आता नेहा तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती सांगेल याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेत्री नेहा गद्रेचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...