आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नकळत सारे घडले' मध्ये बदलणार नेहाचा लुक, पुन्हा सुरु करणार मेडिकल प्रॅक्टिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेतली नेहा, अर्थात नुपूर परूळेकर आता नव्या लुकमध्ये दिसणार आहे. डॉक्टर असलेली नेहा पुन्हा प्रॅक्टिस करताना दिसणार असून, साडीऐवजी पंजाबी ड्रेस वापरायचं तिनं ठरवलं आहे.
 
छोट्या परीला वेळ देण्यासाठी नेहानं आपली मेडिकलची प्रॅक्टिस सोडली होती. आता पुन्हा प्रॅक्टिस करावी, स्वत:चं क्लिनिक सुरू करावं, असं प्रताप नेहाला सुचवतो. प्रॅक्टिस सुरू करताना साडीऐवजी छान पंजाबी ड्रेस घालत जा, असं छोटी परी नेहाला सांगते. प्रताप आणि परीच्या आयडियाला घरच्यांकडूनही पाठिंबा मिळतो. त्यामुळे नेहा  उत्साहानं, नव्या लुकमध्ये पुन्हा प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय घेते. लग्नानंतर प्रॅक्टिसपासून दूर गेलेली, परीच्या संगोपनात रमलेली डॉ. नेहा पुन्हा क्लिनिकमध्ये येणार आहे. नेहाचा हा निर्णय तिच्यासाठी नवी सुरूवात ठरेल का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 
 
नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परूळेकर नव्या लुकविषयी म्हणाली, "नवा लुक मिळणं ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. मला हा लुक आवडला. कॅरी करायला सोपा असा हा लुक आहे. या लुकमुळे परीची इच्छाही पूर्ण झाली. बदललेल्या लुकबरोबरच नेहा ही व्यक्तिरेखाही वेगळ्या पद्धतीनं साकारता येणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, नेहाचा प्रवास कसा असेल या विषयी माझ्याही मनात कुतूहल आहे."
बातम्या आणखी आहेत...