आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठी अभिनेत्रीने केले असे धाडस, आईवडिलांच्या परवानगीने चित्रपटात केले होते Nude Scene

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  मराठीतील बोल्ड अॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्री नेहा महाजनला नुकताच तिच्या 'गाँव' या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. नेहा केवळ मराठी आणि हिंदी नाही तर मल्याळम, बांग्ला चित्रपटातही प्रसिद्धीझोतात आहे. इंग्रजी चित्रपट 'मिडनाईट चिल्ड्रेन'मधून तिने डेब्यू केला आहे.

 

मल्याळम चित्रपटात दिले होते न्यूड सीन्स..

नेहा महाजनने 'द पेटेंड हाऊस' या कादंबरीवर आधारीत मल्याळम चित्रपट 'छायम पोस्सिया विदु'साठी न्यूड सीन्स दिले होते. या सीनमध्ये नेहाने अंगावर एकही कपडा नसताना बेडरुम आणि बाथरुममध्ये फिरताना दिसत होती. या चित्रपटाचा व्हिडिओ लीक झाल्यावर नेहाने सर्वांना त्या व्हिडिओमधील मुलगी तिच असल्याचे सांगितले होते. चित्रपटात दिलेला हा न्यूड सीन चित्रपटाची गरज होती असेही नेहाने सांगितले. हा चित्रपट करण्याअगोदर नेहाने तिच्या आईवडिलांशी  चर्चा केली होती आणि त्यानंतरच अशाप्रकारचा सीन दिला. 

 

वडील आहेत प्रसिद्ध सतारवादक..
फार कमी लोकांना माहीत आहे की नेहा महाजन सतारवादक आहे. नेहाचे वडील पंडीत विदुर महाजन हे प्रसिद्ध सतारवादक आहेत. त्यांच्याकडेच नेहाने सतारवादनाचे धडे घेतले. त्यांच्यासोबतच्या अनेक कार्यक्रमांना नेहा हजेरी लावत असते. 

 

युएसएमधून गिरविले अभिनयाचे धडे..
नेहाचा जन्म तळेगाव दाभाडे येथे झाला. नेहाने युएसएमधील टेक्सास येथील ट्रिंबल टेक हायस्कुलमध्ये अभिनयाचे धडे गिरवले. नेहा अकरावी करत असताना अमेरिकेत गेली. त्यामुळे अकरावीचं अर्ध वर्ष आणि बारावी ती अमेरिकेत शिकली आहे. अमेरिकेहून परतल्यानंतर नेहाने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बीए आणि पुणे विद्यापीठातून फिलॉसॉफी या विषयात एमए केले.बारावी झाल्यानंतर भारतात आल्यानंतर नेहाला पहिला ब्रेक मिळाला तो सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘बेवक्त बारीश’ या सिनेमात. राजस्थानी हिंदी असलेला हा सिनेमा करताना भरपूर काही शिकायला मिळाल्याचं नेहा सांगते. एमए करत असताना 2012 मध्ये नेहाला दीपा मेहता यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या सिनेमात काम करायची संधी मिळाली. नेहाने 'टीटीएमएम'  कॉफी आणि बरंच काही', 'आजोबा', 'नीळकंठ मास्तर', 'युथ',  ‘संहिता’ या मराठी तर ‘जीबून संदेश’ या आोरिया फिल्ममध्ये नेहाने भूमिका केली आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा महाजनचे आतापर्यंतचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...