आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या चर्चेत आहे. त्याचे खास कारण आहे की मराठीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असलेली नेहा पेंडसे कॉमेडीकिंग कपिल शर्मासोबत कॉमेडी शो फॅमिली टाईम होस्ट करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा एक असा शो असणार आहे जो भारतीय टीव्ही इतिहासात कधीच आतापर्यंत झाला नाही.
नेहा 'मे आई कम इन मॅडम' या टीव्ही शोमध्येही काम केले आहे. बोल्ड इमेज असलेली नेहा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या फिजीकवर विशेष लक्ष देत आहे. आता सध्या नेहा पूर्णपणे फिट झाली आहे. नुकतेच तिने इन्सटाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत त्यात तिचा बदललेला लुक दिसत आहे. असे कमी केले वजन...
यामुळे झाली फिट...
- नेहा जेव्हा हिंदी टीव्ही शो 'मे आइ कम इन मॅडम' मध्ये काम करत होती तेव्हा निर्मात्यांनी तिला तिच्या वाढत्या वजनाबद्दल अल्टीमेटम दिले होते की जर तिने वजन कमी केले नाही तर त्याला शोमधून बाहेर काढण्यात येईल.
- नेहाचा मेकर्ससोबतचा सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट होता पण वाढलेल्या वजनामुळे तो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला नव्हता.
- असे म्हणतात की, नेहाला या शोच्या बाहेरही करण्यात आले होते पण त्यामुळे नेहा आता फिटनेस फ्रिक झाली आहे आणि आता ती वेळोवेळी तिच्या फिटनेसकडे लक्ष देते.
- नेहाच्या या जबरदस्त फिटनेसचे गुपीत आहे पोल डान्स.
- नेहा दिवसभरात जवळपास दोन तास पोल डान्स करते त्यामुळे ती पहिल्यापे फिट दिसत आहे.
- नेहा दिवसातला काही वेळ जीम आणि योग करण्यासाठीही देते.
या शोमध्ये नेहाने केले आहे काम...
- नेहाने 1990 साली हसरतें'मधून डेब्यू केला होता.
- याशिवाय नेहाने 'मीठी-मीठी बातें'(1998-99), 'भाग्यलक्ष्मी'(2011) यांसारख्या मालिकांतही दिसली.
- नेहाने आतापर्यत अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच 'दाग: द फायर'(1999), 'दीवाने'(2000), 'तुमसे अच्छा कौन है'(2002), 'देवदास'(2002), 'ड्रीम्स'(2005), 'स्वामी'(2007), 'असीमा'(2009), 'दिल तो बच्चा है जी'(2011) यांसारख्या मालिकांत काम केले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा पेंडसेचे काही खास PHOTOS...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.