आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुपेरी पडद्यावर आजवर बऱ्याच जोड्या लोकप्रिय झाल्यात. यातील सर्व जोड्या कधी ना कधी प्रथमच एकत्र आल्या होत्या.त्यातील अनेकांनी ऑंनस्क्रीन केमेस्ट्री बळावर रसिकांना मोहिनी घातली आहे. आर.पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी चित्रपटातील ऋषभ व पूजाची नवी जोडी रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. २३ फेब्रुवारीला ‘अॅट्रॉसिटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नवीन असल्यामुळे सुरुवातीला काम करताना अवघडल्यासारखं वाटलं, पण दिग्दर्शक दिपक कदम यांनी आम्हाला समजून घेतल्यामुळे काम करताना मजा आली. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून आमची केमेस्ट्री प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.
अॅट्रॉसिटी’ या कायद्याबाबत समाजात विशेष जागृती नाही ही जागृती व्हावी या उद्देशाने डॉ. राजेंद्र पडोळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन दिपक कदम यांचे आहे. या दोघांसोबत या चित्रपटात यतिन कार्येकर, विजय कदम, गणेश यादव, लेखा राणे, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, निखिल चव्हाण, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संकल्पना डॉ. राजेंद्र पडोळे यांची असून राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. छायांकन राजेश सोमनाथ तर संकलन विनोद चौरसिया यांचे आहे. संगीत अमर रामलक्ष्मण यांचे आहे.
अॅट्रॉसिटी’ हा सिनेमा २३ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.